मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सिद्धार्थ- शेहनाझच्या लग्नाची सुरू झाली होती तयारी; डिसेंबरमध्ये बांधणार होते लग्नगाठ

सिद्धार्थ- शेहनाझच्या लग्नाची सुरू झाली होती तयारी; डिसेंबरमध्ये बांधणार होते लग्नगाठ

 शेहनाझ आणि सिद्धार्थ हे लवकरच लग्नं करणार होते. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची लगबग देखील सुरू होती.

शेहनाझ आणि सिद्धार्थ हे लवकरच लग्नं करणार होते. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची लगबग देखील सुरू होती.

शेहनाझ आणि सिद्धार्थ हे लवकरच लग्नं करणार होते. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची लगबग देखील सुरू होती.

  • Published by:  News Digital

मुंबई  4 सप्टेंबर :  अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) 2 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्याच्या निधनाची बातमी अजूनही त्याच्या चाहत्यांना पचवणं कठीण जात आहे. तसेच त्याच्या कुटुंबासाठी आणि निकटवर्तीयांसाठी हा मोठा धक्का आहे. कुटुंबातील एकमेव मुलगा गेल्याने सिद्धार्थच्या आईचं दुःख पाहून त्याच्या चाहत्यांनाही रडू अनावर झालं होतं. काल मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.

सिद्धार्थच्या कुटुंबीयांसोबतच त्याची अगदी जवळची मैत्रीण आणि कथित प्रेयसी शेहनाझ गिल (Shehnaaz Gill) ही देखील मोठ्या दुःखातून जात आहे. दरम्यान आता अशी माहिती समोर येत आहे की, शेहनाझ आणि सिद्धार्थ हे लवकरच लग्नं करणार होते. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची लगबग देखील सुरू होती.

दोन वर्षांपूर्वी बिग बॉस या टीव्ही रिॲलिटी शोमध्ये ते दोघेही एकमेकांना भेटले होते. शो मधील त्यांची मैत्री, केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच भावली होती. चाहत्यांनी त्यांना सिधनाझ असं नाव देखील दिलं होतं. शो संपल्यानंतर देखील त्यांचा बाँड तुटला नाही. ते नेहमी एकत्रच दिसायचे. ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं मात्र त्यांनी जगासमोर गंभीर रित्या कधीही त्याची कबुली दिली नव्हती.  आम्ही अगदी जवळचे मित्र आहोत असं त्यांच्याकडून सांगितला जायचं. मात्र शेहनाझच सिद्धार्थ वरचं प्रेम सोशल मीडियावर नेहमी पाहायला मिळायचं.

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार या वर्षाअखेरीस ते दोघेही लग्नगाठ बांधणार होते. डिसेंबर महिन्यात त्यांचं लग्न होणार होतं. दोघांच्या कुटुंबांची देखील यासाठी परवानगी होती. तर लग्नाची लगबग देखील सुरू झाली होती. इतकचं नाही तर कुटुंबीय मुंबईतील एक आलिशान हॉटेल आणि बँक्वेट्सची बुकिंग देखील करत होते. 3 दिवसांच्या या सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली होती.

दरम्यान शेहनाझ आणि सिद्धार्थच हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. लग्नाआधीच सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला. शेहनाझ मात्र त्याच्या आठवणीत दुःख व्यक्त करताना दिसत आहे.

First published:

Tags: Entertainment, Sidharth shukla