मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

विकी-कतरिना अन् आलिया-रणबीरच नव्हे तर सिद्धार्थ-कियाराचीही सुरुये लगीनघाई? वाचा Inside Story

विकी-कतरिना अन् आलिया-रणबीरच नव्हे तर सिद्धार्थ-कियाराचीही सुरुये लगीनघाई? वाचा Inside Story

बॉलीवूड (Bollywood)  अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे  (Sidharth Mlhotra)  वैयक्तिक आयुष्य त्याच्या व्यावसायिक आयुष्याइतकेच मनोरंजक आहे. अभिनेत्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'शेरशाह' या चित्रपटाने सिद्धार्थ मल्होत्राला मोठे यश मिळवून दिले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई,9 नोव्हेंबर-   बॉलीवूड (Bollywood)  अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे  (Sidharth Mlhotra)  वैयक्तिक आयुष्य त्याच्या व्यावसायिक आयुष्याइतकेच मनोरंजक आहे. अभिनेत्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'शेरशाह' या चित्रपटाने सिद्धार्थ मल्होत्राला मोठे यश मिळवून दिले आहे. यावेळी सिद्धार्थकडे असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत जे त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहेत. या सगळ्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा लग्न  (Wedding Plan)  करण्याचा विचार करत आहे.

'शेरशहा' चित्रपटानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी एकेमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा  सुरु आहेत. HT च्या बातमीनुसार, जेव्हा सिद्धार्थला त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो हसला आणि म्हणाला, “अद्याप याबद्दल कोणतीही योजना नाही. मला वाटते की हे नक्कीच घडेल. तो चित्रपट अजून तयार झालेला नाही. माझ्याकडे त्याची कथा नाही आणि स्क्रिप्ट किंवा कलाकारही तयार नाहीत. जेव्हा हे घडेल तेव्हा मी सर्वांना कळवीन."सिद्धार्थच्या या खुलास्यानंतर चाहत्यांमध्ये कियारा आणि त्याच्यानात्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा  सध्या ३६ वर्षांचा आहे. आता लवकरच तो 'मिशन मजनू'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच वेगळी आहे. 'शेरशाह' नंतर लोकांनी त्याला अधिक गांभीर्याने घ्यायला सुरुवात केल्याचे तो म्हणतो. तो म्हणाला, “मला वाटते यशामुळे कलाकार म्हणून तुमचा आत्मा बदलतो. मी एक कलाकार म्हणून कामावर परतलो आहे आणि मला खात्री आहे की जेव्हा मी याबद्दल सांगेन  तेव्हा त्याला अधिक महत्त्व दिले जाईल."

(हे वाचा:विजय देवरकोंडा या व्यक्तीला करतोय डेट? ; स्व:ता केला खुलासा )

तीन वर्षांपूर्वी मी याबद्दल सांगितलं असतं, तेव्हा मी हे  'करू किंवा नको करू' असा विचार त्यांनी केला असता. पण आता मी एका अशा चित्रपटात काम केलं आहे. जे प्रेक्षकांशी जोडलेलं आहे. मी हा सकारात्मक बदल म्हणून पाहतो. मी ज्याच्याशी संबंधित आहे, मला बदल घडवून आणायचा आहे आणि त्याला उत्कटतेच्या भावनेने जोडायचे आहे. मी असे म्हणत नाही की मला चांगले माहित आहे किंवा त्यावर नियंत्रण ठेवायचे आहे.  मी फक्त असे म्हणत आहे की ट्राय  करण्याचा प्रयत्न करण्यात काही नुकसान नाही'. 'मिशन मजनू' मध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दाक्षिणात्य स्टार आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदना बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या दोघांची जोडी पहिल्यांदाच झळकणार आहे. त्यामुळे चाहते आहेत.

First published: