मुंबई, 1 फेब्रुवारी- बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीला ओळखलं जातं. गेल्या अनेक दिवसापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची जोडी प्रचंड पसंत केली जाते. हे सेलिब्रेटी कपल कधी लग्न करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. दरम्यान आता अथिया शेट्टी आणि केएल राहुलनंतर हे दोघेही लग्न बंधनात अडकण्याची तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे. कियारा आणि सिद्धार्थबाबत एक नवा रिपोर्ट समोर आला आहे, पाहूया काय आहे हा रिपोर्ट.
अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची जोडी प्रचंड पसंत केली जाते. 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यांची जोडीसुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली होती. या चित्रपटानंतर कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करु लागले होते. या दोघांनी सुरुवातीला आपलं नातं लपवलं होतं. मात्र आता हे दोघेही एकत्र सोबत फिरताना आणि व्हेकेशन एन्जॉय करताना दिसून येतात.गेल्यावर्षीपासून कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. परंतु असं झालं नाही. मात्र या नव्या वर्षात अनेक सेलिब्रेटी कपल्स लग्नगाठ बांधणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलने लग्नगाठ बांधत बी टाऊनमध्ये लग्नसराईला सुरुवात केली आहे.
दरम्यान आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. हे जोडपं लवकरच लग्नाच्याबेडीत अडकू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. इतकंच नव्हे तर या दोघांनी आपल्या लग्नाची तयारीदेखील सुरु केल्याचं म्हटलं जात आहे. नुकतंच समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री कियारा अडवाणीला सेलिब्रेटी डिझायनर मनीष मल्होत्रासोबत पाहण्यात आलं आहे. त्यामुळे अभिनेत्री मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला लेहेंगा परिधान करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा सध्या मुंबईमध्ये नव्हे तर दिल्लीमध्ये आहे. दिल्ली हे सिद्धार्थचं होमटाऊन आहे. रिपोर्ट्सनुसार सिद्धार्थ आल्पल्या कुटुंबासोबत मिळून आपल्या लग्नाची तयारी पाहात आहे. त्यामुळे तो कुटुंबियांसोबत सध्या दिल्लीत आहे. आणि याठिकाणी तयारी करुन तो थेट वेडिंग व्हेन्यूवर पोहोचणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार सिद्धार्थ आणि कियाराने आपल्या लग्नाचं स्थळ ठरवलं आहे. हे दोघे राजस्थानमधील जैसलमेर याठिकाणी शाही लग्न सोहळा करणार आहेत. या लग्नामध्ये कुटुंबीय आई होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.