• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Mission Majnu ची रिलीज डेट आली समोर; पहिल्यांदाच दिसणार सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदनाची जोडी

Mission Majnu ची रिलीज डेट आली समोर; पहिल्यांदाच दिसणार सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदनाची जोडी

सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची मुख्य भूमिका असलेल्या 'मिशन मजनू' या चित्रपटाची प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं दिसत आहे

 • Share this:
  मुंबई,2 नोव्हेंबर- सिद्धार्थ मल्होत्रा  ​​(Sidharth Malhotra)  आणि रश्मिका मंदाना  (Rashmika Mandanna)  यांची मुख्य भूमिका असलेल्या 'मिशन मजनू' या चित्रपटाची प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं दिसत आहे. हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. नुकताच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. निर्माते पुढील वर्षी 13 मे 2022 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करणार आहेत. शंतनू बागची दिग्दर्शित या चित्रपटातून साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
  'शेरशाह' चित्रपटाच्या यशानंतर सिद्धार्थ मल्होत्राच्या या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. पीरियड ड्रामा असणाऱ्या या चित्रपटात सिद्धार्थ एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून रिलीज डेटची माहिती दिली आहे. सिद्धार्थच्या जबरदस्त फॅन फॉलोइंगचा परिणाम म्हणजे चित्रपटाची रिलीज डेट पोस्ट केल्यानंतर एका तासात 1 लाख 85 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहते कमेंट करून सिद्धार्थचे कौतुक करत आहेत. 11 फेब्रुवारी 2021 पासून चित्रपटाचे शूटिंग सुरू झालं होतं. मिशन मजनू स्टार कास्ट- 'मिशन मजनू'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासह शारीब हाश्मी, परमीत सेठी, अनंत महादेवन आणि कुमुद मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. जाहिरातींच्या दुनियेत अधिराज्य गाजवणारे दिग्दर्शक शंतनू बागची या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शनाच्या दुनियेत पाऊल ठेवत आहेत. या दृष्टीनेही या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटात सिद्धार्थ आणि रश्मिका मंदान्ना यांची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. साऊथ इंडस्ट्रीमध्ये रश्मिकाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. ( हे वाचा:शाहरुख नव्हे तर सलमान खरेदी करणार होता 'मन्नत'; या कारणामुळे किंग खानला मिळालं..) असं आहे कथानक- रॉनी स्क्रूवाला, अमर बुटाला आणि गरिमा मेहता 'मिशन मजनू'चे निर्माता आहेत. रॉनीने यापूर्वीच या टीमसोबत 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाची कथादेखील भारत-पाकिस्तान संबंधांवर आधारित सत्य घटनेवर आधारित आहे. हा ऐतिहासिक चित्रपट 1970 च्या दशकात पाकिस्तानच्या भूमीवर भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी RAW ऑपरेशनची कथा दर्शवेल. या धाडसी मिशनने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले होते.
  Published by:Aiman Desai
  First published: