मुंबई, 08 फेब्रुवारी : भारतात लाल रंगाला सौभाग्य आणि समृद्धीचा रंग मानलं जातं. लग्न सोहळ्यांमध्ये नववधूदेखील याच रंगाचे कपडे घालतात. प्रेमाच्या लाल रंगाशिवाय भारतीय विवाहसोहळ्यांची कल्पनाही करता येत नाही. पूर्वीपासून लग्न सोहळ्यांमध्ये लाल रंगाचे कपडे घालतात. कारण, लाल रंगाचे कपडे त्यांच्या विवाहित जीवनासाठी पवित्र मानले जातात. पारंपरिक असला तरी लाल रंग मोहक दिसतो, मग तो लाल रंगाचा लेहेंगा असो किंवा बनारसी साडी. सामान्य मुलींपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत बहुतांश मुली लग्नात लाल रंगाला पसंती देतात. मात्र, अनेकजणींनी थोडी वेगळी वाट धरली आहे. आजकाल लग्नात लाल रंगाऐवजी इतर पेस्टल रंगांच्या कपड्यांना प्राधान्य दिलं जात आहे.
प्रियांका चोप्रा-जोनास, सोनम कपूर-आहुजा, आणि बिपाशा बसू-ग्रोव्हर यांनी त्यांच्या लग्नासाठी लाल रंगाच्या कपड्यांची निवड केली होती. पण, इतर सेलिब्रिटींनी लाल रंगाला बगल दिली आहे. इतर रंगाच्या कपड्यांमध्येही तुम्ही लग्नात ग्लॅमरस दिसू शकता, हे या सेलिब्रिटींनी दाखवून दिलं आहे. अशा ट्रेंडसेटर सेलिब्रिटींमध्ये खालील अभिनेत्रींचा समावेश होतो.
हेही वाचा - कियारा ते आलिया; बॉलिवूडमध्ये आलाय सूर्यास्तावेळी लग्न करण्याचा ट्रेंड, कारण आहे खूपच खास
अनुष्का शर्मा: 'पॉवर कपल' अशी ओळख असलेले अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 2017 मध्ये इटलीतील टस्कनी येथे लग्नाच्या बंधनात अडकले. अनुष्कानं तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो प्रसिद्ध करेपर्यंत त्यांनी लग्नसोहळा गुपित ठेवला होता. तिनं लग्नाच्या दिवशी भरतकाम असलेला सब्यसाची ब्लश पिंक लेहेंगा घातला होता. लग्नाच्या कपड्यांसोबत तिनं नैसर्गिक मेकअप आणि न्यूड लिप्सस्टिकचा पर्याय निवडला होता. शिवाय केसांचा मधोमध भांग पाडून बांधलेल्या आंबाड्याला फिकट गुलाबी गुलाब लावले होते.
View this post on Instagram
नेहा धुपिया: गुलाबी रंग हा सेलिब्रिटींचा आवडता रंग आहे असं दिसतं. अभिनेत्री नेहा धुपियानंदेखील डिझायनर अनिता डोंगरेकडून सॉफ्ट पिंक रंगाचा लेहेंगा तयार करून घेतला होता. अंगद बेदीशी झालेल्या गुरुद्वारातील लग्नासाठी हा रंग अतिशय योग्य होता. तिच्या ओढणीच्या बॉर्डरवर पेस्टल हिरवा आणि बबलगम गुलाबी रंग होता. त्यामुळे ओढणी आणखी खुलून दिसत होती. या कपड्यांसोबत तिनं जड चोकर सेट व झुमके घातले होते. लूकला सूट करेल यासाठी हलका मेकअप करण्यात आला होता.
हेही वाचा - Sidharth-Kiara Wedding: कियाराच्या हातातील कलिऱ्यांमध्ये लपलीय खास गोष्ट; पाहून तुम्हीही कराल कौतुक
नताशा दलाल: नताशा दलाल आणि वरुण धवन यांनी लग्न करून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले. या जोडप्याने गेल्या वर्षी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. नताशानं तिच्या 'नताशा दलाल लेबल'मधील कपडे घातले होते. तिनं सोन्याचे मणी आणि सिक्वीन्ससह सोनेरी रंगाचा लेहेंगा घातलं होता. त्यावर फुलांची नक्षी असलेली ओढणी घेतली होती. स्टेटमेंट नेकलेस, मॅचिंग कानातले आणि मांग टिक्यासह तिनं सॉफ्ट ग्लॅम लुक केला होता.
नेहा कक्कर: प्रसिद्ध गायक नेहा कक्करनंदेखील अनुष्कासारखाच लेहेंगा घातला होता. तिनं आपल्या लग्नात दाट एम्ब्रॉयडरी असलेला फिकट गुलाबी रंगाचा सब्यसाची लेहेंगा घातला होता. त्यावर ऑर्गेन्झा ओढणी होती. गळ्यात मोठा हार आणि मांग टिका घालून हलका मेकअप केला होता.
रिया कपूर: अनिल कपूर यांची लेक रिया कपूरनंदेखील अनामिका खन्नानं डिझाइन केलेल्या चंदेरी साडीत लग्न केलं. तिनं दीर्घकाळापासून प्रियकर असलेल्या करण बुलानीशी लग्नगाठ बांधली. बिर्धीचंद ग्यानशामदास यांनी डिझाइन केलेल्या विंटेज मोत्याच्या परदामध्ये फारच सुंदर दिसत होती. यासोबत तिनं तिच्या आई सुनीता कपूरनं तयार केलेल झुमके, नेकपीस आणि सोन्याचे कंगन घातले होते. मधून भांग पाडून मोकळे सोडलेले केस आणि टिंट केलेले ओठ आणि पंखांप्रमाणे लावलेल्या लायनरमुळे ती अतिशय सुंदर दिसत होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News