कारगिल युद्धाच्या 'या' हिरोवर येतोय बायोपिकचं, सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार मुख्य भूमिकेत

कारगिल युद्धाच्या 'या' हिरोवर येतोय बायोपिकचं, सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार मुख्य भूमिकेत

कारगिल युद्धामध्ये कॅप्टन विक्रम बात्रा यांना त्यांचं शौर्य आणि साहस पाहता पाकिस्तान सैन्यनं त्यांना 'शेरशाह' हा कोडवर्ड दिला होता.

  • Share this:

मुंबई, 2 मे : 1998  मध्ये कारगिल येथे झालेल्या युद्धात भारतीय सैन्यानं जो पराक्रम गाजवला त्यात कॅप्टन विक्रम बात्रा यांचं नाव अभिनानं घेतलं जातं. लवकरच कारगिल युद्धाच्या या हिरोच्या जीवनावर आधारित बायोपिक बनत असून या बायोपिकच नावही आता ठरलं आहे. कॅप्टन बात्रा यांच्या बायोपिकला 'शेरशाह' हे नाव देण्यात आलं आहे. या बायोपिकमध्ये विक्रम बात्रा यांची व्यक्तिरेखा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार आहे.

कारगिल युद्धामध्ये अतुलनीय साहस दाखवणाऱ्या कॅप्टन विक्रम बात्रा यांना त्यांचं शौर्य आणि साहस पाहता पाकिस्तान सैन्यनं त्यांना 'शेरशाह' हा कोडवर्ड दिला होता. आता हाच कोडवर्ड त्यांच्या बायोपिकचं नाव म्हणून वापरण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशात जन्मलेले विक्रम बात्रा 1996मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते. मात्र कारगिल युद्धाच्या वेळी आपल्या सहकाऱ्याला वाचवत असताना त्यांना गोळी लागली आणि ते शहिद झाले. त्यांनी कारगिल युद्धात दिलेल्या योगदानसाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
 

View this post on Instagram
 

Excited to play Vikram Batra, a real-life hero on screen! Titled - #Shershaah! Shooting begins soon 🎥 @kiaraaliaadvani #VishnuVaradhan @karanjohar #HirooJohar @apoorva1972 @shabbirboxwalaofficial #AjayShah #HimanshuGandhi @dharmamovies


A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra) on


या आधी जे पी दत्ता यांच्या 'एल ओ सी कारगिल' या सिनेमामध्ये अभिनेता अभिषेक बच्चनने कॅप्टन विक्रम बात्रा याची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता विक्रम बात्रा याच्या जीवनावर 'शेरशाह' हा बायोपिक बनवला जाणार आहे. करण जोहरचं धर्मा प्रॉडक्शन या सिनेमाची निर्मिती करणार आहे. या सिनेमाची कथा संदीप श्रीवास्तव यांनी लिहिली असून दिग्दर्शन विष्णू वर्धन करणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रासोबत कियारा अडवाणी कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'गुड न्यूज' नंतर धर्मा प्रॉडक्शनसोबत कियाराचा हा दुसरा सिनेमा आहे. कियाराच्या आधी या भूमिकेसाठी कतरिना कैफला विचारण्यात आलं होतं. या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात केली जाणार असून पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
 

View this post on Instagram
 

Monday Blues #PostPackUpShot @avigowariker


A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

मुंबईमध्ये रजनीकांत यांच्या टीमवर दगडफेक

Viral होतेय प्रियांका चोप्रा आणि निक जोनसची पब्लिक किस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 06:20 PM IST

ताज्या बातम्या