• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • कतरिना -विकीच्या संगीत नाईटमध्ये सिद्धार्थ-कियारा करणार खास डान्स

कतरिना -विकीच्या संगीत नाईटमध्ये सिद्धार्थ-कियारा करणार खास डान्स

बॉलिवूड स्टार कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे.कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही चर्चित जोडीही या विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 नोव्हेंबर- बॉलिवूड स्टार कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा हॉटेलमध्ये दोघंही लग्न बंधनात अडकणार आहेत. 7 ते 12 डिसेंबर दरम्यान हा लग्नसोहळा चालणार आहे. त्यासाठी हॉटेल बुकिंगही पूर्ण झाल्याचं बोललं जात आहे. अद्याप दोघांपैकी कोणाचंही लग्नाबाबत अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. पण, त्यांच्या लग्नाचे ठिकाण, ड्रेस आणि पाहुण्यांची यादी अनेकदा चर्चेत असते. विकी आणि कतरिनाच्या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या सेलेब्रिटींची एक यादी नुकतीच पुढे आली आहे. यामध्ये बी टाऊनमधील काही खास कपलही असणार आहेत. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही चर्चित जोडीही या विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे संगीत नाईटमध्ये ते परफॉर्मन्सही करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही खास मेजवानी असणार आहे. वाचा : कडक VIDEO : अंतरा फेम योगिता चव्हाणचा लयभारी डान्स पाहिला का? कियारा आणि सिद्धार्थने करण जोहरच्या शेरशहा या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कियारा आणि सिद्धार्थची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटात एकत्र काम करण्याच्या अगोदरपासूनच दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होत होत्या. तसेच एकत्र फिरताना ते अनेकदा कॅमेरात कैदही झाले होते. आता कियारा आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच थेटपणे एकत्र चाहत्यांसमोर येणार आहेत. ही क्यूट जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. वाचा : Yodha: करण जोहरच्या पहिल्या अ‍ॅक्शन फिल्ममध्ये सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी दरम्यान, विकी आणि कतरिनाच्या विवाहाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या ग्रँड विवाह सोहळ्यात वेगवेगळ्या इव्हेंटसाठी वेगवेगळ्या कंपन्यांना हायर करण्यात आले आहे. मंगळवारी 10 सदस्यीय पथक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सिक्स सेन्स बर्वरा किल्ल्यावर पोहोचले. हॉटेल व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीम लग्नाशी संबंधित सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे.  यासोबतच बॉलिवूड वर्तुळात रणबीर  कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाची चर्चा देखील रंगली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: