मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /14 जानेवारीला चाखता येणार स्पृहा जोशीच्या 'कॉफी' ची चव

14 जानेवारीला चाखता येणार स्पृहा जोशीच्या 'कॉफी' ची चव

प्रेमाची कॉफी (coffee) घेऊन येत आहे मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी (spruha joshi), अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (sidharth chandekar) आणि कश्यप परुळेकर.

प्रेमाची कॉफी (coffee) घेऊन येत आहे मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी (spruha joshi), अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (sidharth chandekar) आणि कश्यप परुळेकर.

प्रेमाची कॉफी (coffee) घेऊन येत आहे मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी (spruha joshi), अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (sidharth chandekar) आणि कश्यप परुळेकर.

मुंबई, 28 ऑक्टोबर : बऱ्याच जणांनी कॉफी प्यायली असेल पण प्रेमाच्या कॉफीच्या चव फक्त काहींनी घेतली असणार. आता सर्वांना या प्रेमाच्या कॉफीची चव चाखता येणार आहे. ही प्रेमाची कॉफी (coffee) घेऊन येत आहे मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी (spruha joshi), अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (sidharth chandekar) आणि कश्यप परुळेकर.  14 जानेवारीला कॉफी हा सिनेमा सिनेमागृहात येत आहे. स्पृहाने सोशल मीडिया पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

स्पृहा जोशीने सिनेमाचं पोस्टर पोस्ट करत म्हटलं आहे की, कॉफी'.. 14 जानेवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ☺️.एक आनंदाची बातमी, 14 जानेवारी रोजी आमचा "कॉफी" हां चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शीत होत आहे.तरी आपलें शुभ आशीर्वाद असावेत ही सदिच्छा.🙏😊..अशी पोस्ट तिनं केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

‘तन्वी’ फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे. कैलास सोरारी आणि विमला सोरारी या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा मच्छिंद्र बुगडे यांची आहे. तर संवाद मच्छिंद्र बुगडे आणि नितीन कांबळे यांनी लिहिले आहेत. संकलन राहुल भातणकर यांनी केले आहे. छायांकन आय गिरिधरन यांनी केले आहे. गीते अशोक बागवे, नितीन कांबळे यांनी लिहिली आहेत. संगीत तृप्ती चव्हाण यांचे आहे. कलादिग्दर्शन हरीश आईर यांचे आहे. कार्यकारी निर्माते संजय कांबळे आहेत.

वाचा : Mazi Tuzi Reshimgath मालिकेतील हा कलाकार आहे बेस्टचा कर्मचारी

प्रेमाचे वेगवेगळे अनुभव प्रत्येकजण घेत असतो. अशाच काहीशा कटू-गोड अनुभवाच्या प्रेमाची लज्जतदार गोष्ट ‘कॉफी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. या  सिनेमाच्या निमित्ताने मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी (spruha joshi), अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (sidharth chandekar) आणि कश्यप परुळेकर यांना पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. प्रेक्षकांसाठी हा सिनेमा पर्वणी असल्याचे तर पोस्टरवरून दिसत आहे. स्पृहाने सिनेमाबद्दल पोस्ट करताच चाहत्यांनी  देखील चांगला प्रतिसाद दिला आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment