या 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार

या 'खास मित्रा'चा सिद्धार्थ चांदेकरनं सेटवर केला पाहुणचार

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनंही अशी एक पोस्ट टाकलीय. त्यावरून त्यानं सेटवर एका खास पाहुण्याचं स्वागत केलंय.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : मराठी कलाकारांचं काय चाललंय, हे बऱ्याचदा त्यांच्या इन्स्ट्राग्रामवरून कळतं. बरेच कलाकार सोशल मीडियावर खूप कार्यरत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनंही अशी एक पोस्ट टाकलीय. त्यावरून त्यानं सेटवर एका खास पाहुण्याचं स्वागत केलंय.

सिद्धार्थनं लिहिलंय, सेटवर एक मित्र भेटायला आला. तो म्हणाला शूटिंग चालूच असतं तुझं, आधी डोकं खाजवून दे. बरं ठीके. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा पाहुणा आहे कोण? तर फोटो पाहून सगळ्या शंकांचं निरसन होतं. सेटवर एक कुत्रा आला होता. सिद्धार्थनं त्याचं प्रेमानं स्वागत केलं. त्याला प्राण्यांची खूप आवड आहे. त्यामुळे शूटिंग थांबवून सिद्धार्थनं याचे लाड केले.

 

View this post on Instagram

 

सेट वर एक मित्र भेटायला आला. तो म्हणाला शूटिंग चालूच असतं तुझं, आधी डोकं खाजवून दे. बरं ठीके. #भुभु

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

सिद्धार्थ आणि अभिनेत्री मिताली मयेकर एकमेकांच्या प्रेमात आहेत. सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी मितालीसोबतचा एक डबस्मॅश व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत सिद्धार्थ मितालीला 'मी काही तुझा भाऊ नाही, मला भाऊ म्हणू नको' असे म्हणत होता तर दुसरीकडे मिताली आणि सिद्धार्थने मनगटावर एकत्र टॅटू देखील काढले आहेत. त्यामुळे सिद्धार्थ आणि मितालीच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना चांगलाच ऊत आला होता.

लाॅस्ट अॅण्ड फाऊंड, पिंडदान, गुलाबजाम अशा दर्जेदार सिनेमांमध्ये सिद्धार्थनं काम केलंय. सोनाली कुलकर्णीसोबतचा गुलाबजाम विशेष गाजला होता.

सोनम कपूरचा फॅशन जलवा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2018 05:52 PM IST

ताज्या बातम्या