S M L

सिद्धार्थ चांदेकरनं साजरा केला मितालीसोबत व्हॅलेंटाइन्स डे!

सिद्धार्थ-मितालीमधील वाढती जवळीक पाहून हे दोघं एकमेकाला डेट करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय.

Sonali Deshpande | Updated On: Feb 16, 2018 02:00 PM IST

सिद्धार्थ चांदेकरनं साजरा केला मितालीसोबत व्हॅलेंटाइन्स डे!

16 फेब्रुवारी : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतोय.सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकरसोबत त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केलाय. एवढंच नव्हे तर सिद्धार्थने यंदाचा व्हॅलेंटाइन्स डे देखील मितालीसोबत साजरा केला.

याआधी सिद्धार्थ 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनाया म्हणजेच रसिका सुनीलला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण आता सिद्धार्थ-मितालीमधील वाढती जवळीक पाहून हे दोघं एकमेकाला डेट करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय.

सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी मितालीसोबतचा एक डबस्मॅश व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत सिद्धार्थ मितालीला 'मी काही तुझा भाऊ नाही, मला भाऊ म्हणू नको' असे म्हणत होता तर दुसरीकडे मिताली आणि सिद्धार्थने मनगटावर एकत्र टॅटू देखील काढले आहेत. त्यामुळे सिद्धार्थ आणि मितालीच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना चांगलाच ऊत आला होता.

Loading...

And. Happy Valentine's Day ❤️🌼 #thisisit P.C @kshitijpatwardhan

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 02:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close