मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /गणपती बाप्पा मोरया! सिद्धार्थ-मितालीचं लग्नानंतर पहिलं गणेशोत्सव

गणपती बाप्पा मोरया! सिद्धार्थ-मितालीचं लग्नानंतर पहिलं गणेशोत्सव

सिद्धार्थ-मितालीने महिन्यांपूर्वी पारंपरिक पद्धतीने लग्न करत यांनी एकेमकांसोबत जन्मभराची गाठ बांधली आहे.

सिद्धार्थ-मितालीने महिन्यांपूर्वी पारंपरिक पद्धतीने लग्न करत यांनी एकेमकांसोबत जन्मभराची गाठ बांधली आहे.

सिद्धार्थ-मितालीने महिन्यांपूर्वी पारंपरिक पद्धतीने लग्न करत यांनी एकेमकांसोबत जन्मभराची गाठ बांधली आहे.

मुंबई, 8 सप्टेंबर- मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय कपलमधील एक म्हणून मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर(Sidharth Chandekar) यांना ओळखलं जात. या दोघांना सोशल मीडियावरदेखील प्रचंड पसंत केल जातं. हे जोडपं सतत सोशल मीडियावर असतं. या दोघांच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत असतात. आज या गोड जोडीला आशिर्वाद देण्यासाठी त्यांच्या घरी बाप्पा अवतरला आहे. या दोघांचं लग्नानंतर हे पहिलं गणेशोत्सव आहे. या दोघांनी सुंदर फोटो शेयर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आज सर्वत्र बाप्पाचं आगमन होत आहे. वातावरण अगदी आनंदी आणि भक्तिमय झालं आहे. सर्व कलाकारसुद्धा आज बाप्पाचं मोठ्या उत्साहाने स्वागत करत आहेत. नुकताच अभिनेत्री मिताली मयेकरनं आपल्या इन्स्टाग्रामवर आपला आणि पती अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा एक सुंदर फोटो शेयर केला आहे.

(हे वाचा:'सर्वात मोठा आनंद' म्हणत, रवी जाधवने स्वतः साकारली बाप्पाची सुंदर मूर्ती)

यामध्ये हे गोड कपल आपल्या घरी विराजमान बाप्पासोबत दिसून येत आहेत. सिद्धार्थ आणि मितालीसाठी हे गणेशोत्सव खूपच खास आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण या दोघांचा लग्नानंतरचा हा पहिला गणेशोत्सव आहे. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी लग्न केलं होता. फोटोमध्ये मितालीने निळ्या रंगाची सुंदर अशी काठपदर साडी नेसली आहे. तसेच पारंपरिक दागिनेसुद्धा चढवले आहेत. नाकातील नथने मितालीचं सौंदर्यावर चार चाँद लावले आहेत. तर दुसरीकडे सिद्धार्थने तिला मॅचिंग असा कुर्ता घातला आहे. हे दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.

(हे वाचा:ढोल-ताशाच्या गजरात 'सुंदरा'च्या सेटवर बाप्पा अवतरला; अभि-लतिचा गणपती डान्स)

मिताली आणि सिद्धार्थ 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2018 मध्ये अगदी व्हेलेंटाईन डे दिवशी या दोघांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रेमाची कबूली दिली होती. त्यांनतर काही दिवसांनी त्यांनी साखरपुडा करत सर्वांनाचं सुखद धक्का दिला होता. आणि काही महिन्यांपूर्वी पारंपरिक पद्धतीने लग्न करत यांनी एकेमकांसोबत जन्मभराची गाठ बांधली आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi entertainment