Home /News /entertainment /

‘पैसेच नाही तर स्वतःचं रक्तही देतोय’; मराठी कलाकारांच्या मदतीवर संशय घेणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवचं प्रत्युत्तर

‘पैसेच नाही तर स्वतःचं रक्तही देतोय’; मराठी कलाकारांच्या मदतीवर संशय घेणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवचं प्रत्युत्तर

कुठलीही जाहिरात बाजी न करता मदत करणाऱ्या या कलाकारांना कृपया ट्रोल करु नका अशी विनंती मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवनं (Siddhartha Jadhav) केली आहे.

  मुंबई 15 मे: राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. वाढत्या संक्रमणामुळं लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. (Coronavirus in Maharashtra) अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. लोकांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी बेड उपलब्ध होत नाहियेत. अशा बिकट परिस्थितीत मराठी कलाकार मोठ्या प्रमाणावर लोकांची मदत करत आहेत. कुठलीही जाहिरात बाजी न करता मदत करणाऱ्या या कलाकारांना कृपया ट्रोल करु नका अशी विनंती मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवनं (Siddhartha Jadhav) केली आहे. सिद्धार्थनं मटाला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं मराठी कलाकारांची बाजू भक्कमपणे मांडली. तो म्हणाला, “गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजसृष्टीतील अनेक तरुणांचा करोनामुळे मृत्यू झाला. सुमित्रा भावे, अभिलाषा पाटील, किशोर नांदलस्कर असे ज्येष्ठ कलाकारांना आपण करोनामुळे गमावले आहेत. हे सर्व ऐकून खूप वाईट वाटतं. मराठीसृष्टीतील अनेक कलाकार या करोनाच्या लढ्यात शक्य तेवढी मदत करत आहेत. प्रवीण तरडे, संदीप पाठक, प्रिया बेर्डे, तेजस्विनी पंडीत यांच्यासारखे अनेक कलाकार गावोगावी जाऊन लोकांना मदत करत आहेत. रक्तदानापासून अन्न धान्यापर्यंत विविध प्रकारची मदत केली जात आहे. परंतु तरी देखील लोक केवळ हिंदी कलाकारांचच अधिक कौतुक करतायेत. अर्थात आम्ही याबाबत कुठलीही जाहिरातबाजी करत नाही किंवा तक्रारही नाही. पण मराठी कलाकार काहीच करत नाहीयेत अशी कृपया तक्रार करु नका. त्यांच्या मदतीवर शंका उपस्थित करु नका.” अशी विनंती सिद्धार्थनं केली आहे. ‘दुनियेशी मला घेणदेणं नाही’; ट्रोलर्सला उत्तर देत सुशांतच्या एक्स गर्लफ्रेंडनं केली लग्नाची घोषणा
  महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढला राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येत असलेल्या आकडेवारीमध्ये काहीसं दिलासादायक चित्र दिसू लागलं आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार राज्यात 42,582 नवे करोनाबाधित तर 54,535 डिस्चार्ज नोंदवण्यात आले होते. शुक्रवारी नव्या करोनाबाधितांच्या संख्येत अजून घट झाल्याचं दिसून आलं. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात 39 हजार 923 नवे करोनाबाधित आढळले असून 53 हजार 249 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांमध्य हे प्रमाण वाढल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आता 88.68 टक्क्यांवर गेला आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Coronavirus, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या