मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सिद्धार्थ शुक्लाचं Quarantine Life, आलिशान घराची स्वतः करायचा साफसफाई; Watch Video

सिद्धार्थ शुक्लाचं Quarantine Life, आलिशान घराची स्वतः करायचा साफसफाई; Watch Video

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर सिद्धार्थचा क्वारंटाइन काळ सुरू झाला. त्याच्या यूट्युबवर चॅनलवर (YouTube Channel) व्हिडिओ टाकून त्याने तो एकटा घरातील कामं कशी करतो याची झलक आपल्या प्रेक्षकांना दाखवली होती.

मुंबई, 03 सप्टेंबर: तरुण अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं काल निधन झालं. आता त्याचा पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत नेलं आहे. काही वेळात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. हा टीव्हीवरचा गुणी अभिनेता गेल्याचं वृत्त काल आल्यानंतर बॉलिवूडसह समस्त टीव्हीजगताला (Bollywood & TV Industry) धक्का बसला. आपल्या अभिनयानं टीव्ही क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या या अभिनेत्याला सोशल मीडियावर अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. तो वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो शेअर करून कायम त्याच्या संपर्कात राहायचा.

सिद्धार्थ खासगी आयुष्याबद्दल (Personal Life) बाहेर फारसं बोलायचा नाही पण बिग बॉस 13 मध्ये त्याच्या वागण्याबद्दल आयुष्याबद्दल जाणून घ्यायची संधी प्रेक्षकांना मिळाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर सिद्धार्थचा क्वारंटाइन काळ सुरू झाला. त्याच्या यूट्युबवर चॅनलवर (YouTube Channel) व्हिडिओ टाकून त्याने तो एकटा घरातील कामं कशी करतो याची झलक आपल्या प्रेक्षकांना दाखवली होती.

" isDesktop="true" id="600108" >

या व्हिडिओमध्ये (Video of quarantine period)दिसतंय की सिद्धार्थ राहत होता ते घर किती आलिशान आहे. तिथं महागडा सोफा आणि इतर इंटिरियरही जबरदस्त आहे. यावरून लक्षात येतं की तो किती आलिशान घरात राहत होता. क्वारंटाईन काळात तो भाजी, कांदा चिरताना दिसत आहे. त्यानंतर स्वयंपाकही (Cooking ) तो स्वत: करताना दिसतो आहे. चहाचं भांडं घासताना, घरातला केर काढून तो सुपड्यात भरतानाही सिद्धार्थ दिसत आहे. अभिनेता असला तरीही तो स्वत: ची कामं स्वत: करत होता कारण क्वारंटाइन काळ सुरू होता. या व्हिडिओत तुम्हाला त्याच्या हॉलमध्ये मोठा टीव्ही भिंतीवर अडकवलेला दिसेल. त्याच्याशेजारी त्याला मिळालेल्या ट्रॉफींचं कपाट आहे. तसंच घरातील इतर वस्तूही महागड्या आहेत.

Sidharth Shukla Funeral :शेवटचं अलविदा म्हणण्यासाठी पोहोचली शेहनाझ गिल, स्वत:ला सावरुही शकत नाहीये अभिनेत्री

सिद्धार्थचा 40 वर्षी मृत्यू झाल्याने संपूर्ण बॉलिवूड हळहळलं. बिग बॉस 13 चा (Bigg Boss 13) विजेता ठरलेल्या सिद्धार्थला सोशल मीडियामध्येही भरपूर फॅन फॉलोइंग आहे त्यामुळे त्याच्या मृत्युची बातमी पसरताच लोकांनी त्याला श्रद्धांजली वहायला सुरुवात केली. दबंग सलमान खान, माधुरी दीक्षित (Salman Khan, Madhuri Dixit) यांच्यासारख्या दिग्गजांपासून नवोदित कलाकारांनीही त्याला श्रद्धांजली वाहिली.

टीव्ही मालिका बालिका वधूमध्ये (Balika Vadhu) सिद्धार्थने साकारलेली शिवची भूमिका विशेष गाजली होती. त्या मालिकेत त्याच्यासोबत हिरॉइन म्हणून आनंदीची भूमिका साकरणाऱ्या प्रत्युषा बॅनर्जी हिने 2016 मध्ये आत्महत्या केली होती. सिद्धार्थला हार्ट अटॅक आला होता त्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती काल मिळाली होती.

First published:

Tags: Sidharth shukla