कपिल शर्माच्या 'या' कॉमेडियनचं लग्न मोडलं, गर्लफ्रेंडने लावला मारहाणीचा आरोप

कपिल शर्माच्या 'या' कॉमेडियनचं लग्न मोडलं, गर्लफ्रेंडने लावला मारहाणीचा आरोप

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थनं आपल्या आईवर गंभीर आरोप केले होते.

  • Share this:

मुंबई, 31 मे : 'कॉमेडी सर्कस', 'कॉमेडी क्लासेस' आणि कपिल शर्मा शोमध्ये दिसणारा प्रसिद्ध कॉमेडियन सिद्धार्थ सागरशी संबंधीत एक नवा वाद आता पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थनं आपल्या आईवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता त्याची भावी पत्नी सुबुही जोशीने सिद्धार्थवर कौटुंबीक हिंसाचार आणि मारहाणीचे गंभीर आरोप लावले आहेत.सिद्धार्थ सागरचं लग्न मोडलं असून एका इंग्रजी वेबसाइटनुसार सिद्धार्थ आणि सुबुहीचं लग्न मोडून जवळपास 2 महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. पण आता सुबुहीनं सिद्धार्थवर अनेक गंभीर आरोप केल्याचं समोर येत आहे. सुबुही म्हणणं काहीसं सिद्धार्थच्या आईनं काही दिवसांपूर्वी केलेल्या आरोपांप्रमाणेच आहे.

सिद्धार्थची गर्लफ्रेंड सुबुही जोशीनं सिद्धार्थवर शारिरीक अत्याचारांचे आरोप लावले आहेत आणि आता हे दोघंही दुसऱ्यांदा एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सुबुहीनं सांगितलं, 'जेव्हा आम्ही पहिल्यांदा 2016 मध्ये वेगळे झालो होतो. त्यावेळी त्यानं आपल्या आईला दोषी ठरवलं होतं. खरं तर यासाठी त्याची आई पूर्णपणे यासाठी जबाबदार नव्हती. नतंर आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो आणि साखरपुडा झाल्यावर मी त्याच्यासोबत राहू लागलो त्यावेळी मला त्याचा खरा स्वभाव समजला आणि जे घडलं होतं ते त्याच्या या स्वभावामुळे घडलं होतं हे मला समजलं.'

 

View this post on Instagram

 

Happy Deepavali ❤️✨ #happydiwali #festivevibes

A post shared by Subuhi Joshi ( Essjay ) (@subuhijoshi_essjay) on

सुबुही पुढे म्हणाली, 'मी माझ्याने जेवढं होऊ शकत होतं तेवढं मी हे नातं वाचवायचा प्रयत्न केला. मी त्याची काळी बाजू पाहिली, तो लहान लहान गोष्टींरून रागावत असे आणि माझ्यावर हात उचलत असे. त्याला पैशांची चणचण असल्यानं तो चिडचिड करत असे आणि मला मारहाण करत असे. मार्चमध्ये जेव्हा त्यानं मला मारहाण केली त्यावेळी मला पोलिसांना बोलवावं लागलं होतं. पण त्यावेळी मला हॉस्पिटलमध्ये नेत असताना तो सतत रडत माझी माफी मागत होता. त्याला असं रडताना पाहून मी पोलिसांना त्याला सोडून द्यायला लावलं. पण मी त्यावेळी चूक केली असं मला वाटतं.'

या प्रकारणाबद्दल सिद्धार्थला विचारलं असता तो म्हणाला, '2016मध्ये माझ्या आईमुळे वेगळे झालो होतो. कारण तिला आमचं नातं मान्य नव्हतं. मागच्या वर्षी मी आणि सुबुही पुन्हा एकत्र आलो. आमच्यामध्ये सर्वकाही ठीक चाललं होतं. पण नंतर प्रॉब्लेम सुरू झाले. दोन महिन्यांपूर्वी आम्ही दोघांनी आमचं नातं संपवलं.'

First published: May 31, 2019, 9:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading