बिहारमध्ये बॉलिवूडचे हे दोन सुपरस्टार नवऱ्यांच अपहरण करून लग्न लावतात, पाहा VIDEO Siddharth Malhotra, Parineeti Chopra, Jabariya Jodi

बिहारमध्ये बॉलिवूडचे हे दोन सुपरस्टार नवऱ्यांच अपहरण करून लग्न लावतात, पाहा VIDEO Siddharth Malhotra, Parineeti Chopra, Jabariya Jodi

Siddharth Malhotra, Parineeti Chopra, Jabariya Jodi एकेकाळी बिहारमध्ये सुरू असलेल्या ‘पकडवा विवाह’ या प्रथेवर सिनेमाची कथा आधारित आहे.

  • Share this:

मुंबई, 01 जुलै- बिहारमध्ये तीन पद्धतीने लग्न होतात... हिंम्मतवाल्यांची अरेंज जोडी, नशिबवाल्यांची लव्ह जोडी आणि हुंडा घेणाऱ्यांची जबरिया जोडी. हुंड्यात गाडी आणि महागड्या सामानाची मागणी करणाऱ्या नवरदेवांचं एका मागोमाग एक अपहरण होत आहेत. हे कमी की काय मारपीट करून त्यांचं लग्न दुसऱ्याच मुलींशी लावलं जात आहे. हे काम करण्यात सगळ्यात आघाडीवर आहेत ते म्हणजे बॉलिवूडचे दोन सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा. तुम्हाला अजूनपर्यंत पूर्ण प्रकरण कळलं नसेल तर आम्ही बोलतोय ते सिद्धार्थ आणि परिणीतीच्या आगामी जबरिया जोडी या सिनेमाबद्दल. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

रिंकूचे हे फोटो होतायेत व्हायरल, दिसते बोल्ड अँड ब्युटिफुल

एकेकाळी बिहारमध्ये सुरू असलेल्या ‘पकडवा विवाह’ या प्रथेवर सिनेमाची कथा आधारित आहे. या सिनेमात सिद्धार्थ बिहारी गुंड दाखवण्यात आला आहे. जो हुंड्यासाठी लग्न करणाऱ्या नवऱ्यांचं भर मंडपातून अपहरण करून गरीब घरातल्या मुलींसोबत त्यांचं लग्न लावून देतो. तर परिणीती चोप्राही या सिनेमात दबंग अवतारात दिसत आहे. लग्नाच्या थीमवरील या सिनेमात सिद्धार्थ आणि परिणीतीची लव्हस्टोरी थोडी हटके असणार आहे. इथे पाहा सिनेमाचा ट्रेलर-

झायरा वसीमच्या निर्णयावर अब्बू आझमी आणि शिवसेनेत जुंपली!

लग्नाच्या थीमवर आतापर्यंत अनेक सिनेमे तयार करण्यात आले आहेत. पण या सिनेमाची कथा इतरांपेक्षा वेगळी आहे. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये या कथानकाचा एकही सिनेमा आलेला नाही. बिहारी मुलाच्या भूमिकेत सिद्धार्थला पाहणं उत्सुकतेचं असेल. बालाजी टेलीफिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली असून प्रशांत सिंहने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. प्रशांतने याआधी हीरोपंती आणि तितली या सिनेमाच दिग्दर्शन केलं आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांनी याआधी हंसी तो फंसी सिनेमात एकत्र काम केलं आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता जवळपास पाच वर्षांनी ही हिट जोडी पुन्हा एकदा लोकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आणि परिणीतीचा जबरिया जोडी येत्या २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

जेजुरीत माऊलींच्या पालखीचा मुक्काम, पाहा गडाचा अवर्णनीय Exclusive VIDEO

First published: July 1, 2019, 4:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या