पडद्यावर आपल्या मुलाला, भावाला, काकाला आणि कॅप्टनला पाहून विक्रम यांचे कुटुंबीय अतिशय भावुक झालेले पाहायला मिळाले. विक्रम यांच्या आई वडिलांनी आपल्याला आपल्या मुलाचा सार्थ अभिमान असल्याचं म्हटलं. तसेच सिद्धार्थ ला पाहताना त्यांना विक्रम यांची आठवण झाली असही ते म्हणाले. सिद्धार्थ आणि कियारा च्या अभिनयाचं त्यांनी कौतुकही केलं.View this post on Instagram
1999 साली झालेल्या कारगिल युद्धात अनेक जवानांना सीमेच्या रक्षणासाठी बलिदान द्याव लागलं होतं. त्यात कॅप्टन विक्रम बत्रा हे देखील होते. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लढवय्या ऑफिसरची ही कहाणी शेरशाहच्या रुपात पडद्यावर पाहता येणार आहे. हे फक्त सलमान खानच करू शकतो; फार्म हाऊसवरचा हा VIDEO होतोय VIRAL विक्रम यांच्या प्रेयसीच पात्र अभिनेत्री कियारा अडवाणीने साकारल आहे. दोघांच्या केमिस्ट्रीचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. तसेच चित्रपटातील गाणी ही हीट ठरताना दिसत आहेत. अमॅझॉन प्राईमवर (Amazon Prime) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Sidharth Malhotra