मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी करणार 'या' ठिकाणी लग्न; समोर आली अपडेट

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी करणार 'या' ठिकाणी लग्न; समोर आली अपडेट

सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी

सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल आहे. सध्या हे जोडपं लवकरच लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 3 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल आहे. सध्या हे जोडपं लवकरच लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. ही बातमी समोर येताच त्यांचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरु असल्याचंही पहायला मिळत आहे. अशातच सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची नवी अपडेट समोर आली आहे. याबात पिंकविलानं वृत्त दिलं आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्राच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, दोघेही अनेक महिन्यांपासून लग्नाची ठिकाणे शोधत आहेत. असे कळलं आहे की कियारा आणि सिद्धार्थ चंदीगडमध्ये आलिशान ठिकाण शोधत आहेत जिथे ते थाटामाटत लग्न करु शकतात. चंदीगडमधील ओबेरॉय सुखविला स्पा आणि रिसॉर्टमध्ये लग्नासाठी ते विचार करत आहेत. याच ठिकाणी राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा यांचे लग्न झाले होते. असेही बोलले जात आहे की याआधी दोघेही गोव्यात लग्न करण्याचा विचार करत होते, परंतु सिद्धार्थचे मोठे पंजाबी कुटुंब असल्यानं त्यांनी लोकेशन रद्द केली.

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये दोघांच्या लग्नाची चर्चा झाली होती. याशिवाय अलीकडेच सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खानच्या शो बिग बॉस 16 मध्ये पोहोचला होता. यादरम्यान सलमान खानने सिद्धार्थ मल्होत्राला त्याच्या लग्नाबद्दल आगाऊ शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे लग्नाच्या शुभेच्छा देताना सलमान खान सतत कियारा अडवाणीचा उल्लेख करताना दिसून आला. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आयडिया ही आलीच होती.

दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सिद्धार्थ मल्होत्रा ​​नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'थँक गॉड' या चित्रपटात दिसला होता. आता सिद्धार्थ मल्होत्रा ​​'योधा' आणि 'मिशन मजनू' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. त्याचवेळी कियारा अडवाणी शेवटची 'जुग जुग जिओ' चित्रपटात दिसली होती. आता कियारा अडवाणी 'गोविंदा मेरा नाम' आणि 'सत्य प्रेम की कथा' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Kiara advani, Marriage, Sidharth Malhotra