Home /News /entertainment /

ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान कियाराला भेटण्यासाठी सेटवर पोहोचला सिद्धार्थ मल्होत्रा, समोर आला VIDEO

ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान कियाराला भेटण्यासाठी सेटवर पोहोचला सिद्धार्थ मल्होत्रा, समोर आला VIDEO

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​ (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 'शेरशाह' (Shershah) चित्रपटातील त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीपासून ते त्यांच्या ऑफ-स्क्रीन लव्हस्टोरीपर्यंत हे दोघे नेहमीच चर्चेत असतात.

पुढे वाचा ...
  मुंबई,24 मे-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​  (Sidharth Malhotra)  आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani)  गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 'शेरशाह'  (Shershah)  चित्रपटातील त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीपासून ते त्यांच्या ऑफ-स्क्रीन लव्हस्टोरीपर्यंत हे दोघे नेहमीच चर्चेत असतात. सिद्धार्थ आणि कियाराबद्दलची प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. परंतु सिद्धार्थ आणि कियारा यांनी अद्याप त्यांचं नातं अधिकृत केलेलं नाहीय. तरी ते वारंवार एकेमेकांसोबत हँगआउट करताना दिसून येतात. आता हे जोडपं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पाहूया नेमकं काय घडलंय. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ कियाराच्या चित्रपटाच्या सेटवर तिला भेटायला गेला होता.चेक्स शर्ट, ग्रे जीन्स आणि स्टायलिश सनग्लासेसमध्ये अभिनेता फारच हॅन्ड्सम दिसत होता. विशेष म्हणजे, कियारा शूटिंगमध्ये व्यग्र असताना सिद्धार्थ तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना दिसून आला. सिद्धार्थच्या फॅन पेजवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेता एका व्हॅनिटी व्हॅनमध्ये चढताना दिसत आहे. पिंकविलाच्या मते ही व्हॅन कियाराची आहे ती याठिकाणी शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सिद्धार्थ अलीकडेच कियाराच्या न्यू रिलीज 'भूल भुलैया 2' च्या स्क्रीनिंगसाठी पोहोचला होता. दरम्यान तो कियाराला समर्थन देताना दिसून आला होता. याशिवाय सिद्धार्थने कियारा आणि 'भूल भुलैया 2' च्या टीमलाही आपले प्रेम पाठवत लिहिलं होतं, "भूल भुलैया 2 ला हास्य, रोमांच आणि मनोरंजन मिळाले. शुभेच्छा."अभिनेत्याची ही पोस्टसुद्धा व्हायरल झाली होती.
  View this post on Instagram

  A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

  सिद्धार्थ आणि कियाराची भेट 'शेरशाह' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती . या चित्रपटातून त्यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. विशेष म्हणजे या या चित्रपटाच्या सेटवर यांच्यामध्ये झाली होती. त्यांनतर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं महंत जातं. या दोघांनी एकत्र देशाबाहेर नवीन वर्षाचं स्वागतसुद्धा केलं होतं. परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान सिद्धार्थच्या या व्हिडीओने आता ती फक्त अफवा असल्याचं स्पष्ट होतं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Kiara advani, Sidharth Malhotra

  पुढील बातम्या