मुंबई, 27 मार्च : टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावर मागचे काही दिवस एक व्हिडीओ सातत्यानं व्हायरल होत असून प्रेक्षकांचं डोळे तो व्हिडिओ पाहून पाणावले आहेत. तो व्हिडीओ आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा. मराठी सिनेसृष्टीची लाडके मामा अर्थात अशोक सराफ यांचा नुकताच जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. झी चित्र गौरव मधील त्यांचे खास क्षण सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. मराठी सिनेसृष्टीच्या लाडक्या अशोक मामांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना देण्यात आली. मामांच्या आजवरच्या कारकिर्दीवर सुंदर चित्रफित आणि नृत्याद्वारे सादरिकरण करण्यात आलं. अभिनेता सिद्धार्थ जाधव यानं अशोक मामांची भूमिका साकारत त्यांच्या आतापर्यंतचा प्रवास सर्वांसमोर नृत्याच्या माध्यमातून मांडला. मामांना जीवनगौरव मिळताच सिद्धार्थनं त्यांच्याबरोबर फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टनं आणि फोटोनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
अभिनेता सिद्धार्थ जाधवनं अशोक मामांचा प्रवास नृत्यातून सादर करत त्यांना सलाम केला. अशोक सराफ यांना हे सादरिकरण इतकं आवडलं की त्यांचेही डोळे पाणावले. ते निशब्द झाले. अशोक मामांवर असलेलं प्रेम सिद्धार्थनं सादरिकरणाच्या शेवटी दाखवून दिलं. सिद्धार्थच्या गळ्यातील हार काढून त्यानं मंचावरून धावत खाली उतरून अशोक मामांच्या गळ्यात घातला आणि त्यांच्या पायाशी लोटांगण घातलं. हा क्षण संपूर्ण कार्यक्रमाला चार चांद लावून गेला.
हेही वाचा - अशोक सराफ यांची लाडक्या लेकीला खास गिफ्ट, सायली संजीवला मायेची ऊब म्हणून दिली 'ही' भेट
झी चित्र गौरवकडून अशोक सराफ यांचा जीवन गौरव देऊन सन्मा करण्यात आला. दरम्यान सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे या क्षणी उपस्थित होते. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसाठी अशोक सराफ हे प्रेरणास्थान आणि आदर्श आहेत. त्याच्याकडे बघून अनेकांची बालपणं सुखात, हसत गेली आहेत. अनेक कलाकार त्यांच्या आदर्श समोर ठेवून अभिनय क्षेत्रात आपलं नाव कमावत आहेत. अशाच सगळ्या नव्या पिढीच्या तरूण कलाकारांकडून अशोक सराफ यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. अभिनेता सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे, रितेश देशमुख, आदिनाथ कोठारे, उमेश कामत सारखे कलाकार यावेळी उपस्थित होते.
View this post on Instagram
अशोक मामांना पुरस्कार मिळ्यानंतर सिद्धार्थ चांगलाच भावुक झाला होता. त्यानं अशोक मामांबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलंय, "अशोक सराफ... अशोक मामा... माझ्यासारख्या कित्तेक नवोदित कलाकारांसाठी असलेले द्रोणाचार्य आणि त्यांची मूर्ती मनात बसवून काम करू पाहणारे आम्ही एकलव्य. त्याच्या पायाशी कधी बसायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण आयुष्यातला हा खूप मोठा क्षण आहे जिथे त्यांच्या आयुष्याची कहाणी त्यांच्या समोर मांडण्याची संधी मला मिळाली आणि अशोक मामांना ती मनापासून आवडली. भारावल्या डोळ्यांनी त्यांनी कौतुक केलं, आशिर्वाद दिले.
सिद्धार्थनं पुढे लिहिलंय, "मामांना जीवन गौरव मिळाला हे आहेच पण त्यांच्यासमोर असा परफॉर्मन्स करून माझ्या जीवनाचं सार्थक झालं. हा क्षण आयुष्यभर माझ्या लक्षांत राहील".
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.