मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Siddharth Jadhav: 'मित्रांनो आयुष्यात कधीच...' सिद्धार्थ जाधवचं लग्नावर भाष्य; 'तो' व्हिडीओ चर्चेत

Siddharth Jadhav: 'मित्रांनो आयुष्यात कधीच...' सिद्धार्थ जाधवचं लग्नावर भाष्य; 'तो' व्हिडीओ चर्चेत

सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थ जाधवच्या मजेशीर पोस्ट नेहमीच सर्वांच लक्ष वेधून घेतात. मात्र नुकतीच सिद्धार्थनं एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 फेब्रुवारी : मराठी तसेच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा सर्वांचा लाडका आपला सिद्धू म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव. अभिनेत्यानं त्याच्या तगड्या अभिनयानं तर प्रेक्षकांची मन जिंकलीच मात्र सोशल मीडियावरही सिद्धार्थनं त्याचं नवं विश्व तयार केलं आहे. सिद्धार्थ जाधव सध्या 'आता होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेला सिद्धार्थ त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्ट शेअर करत असतो. त्याच्या मजेशीर पोस्ट नेहमीच सर्वांच लक्ष वेधून घेतात. मात्र नुकतीच सिद्धार्थनं एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सिद्धार्थ आणि त्याची बायको तृप्ती अक्कलवार या जोडप्याला स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. मुलगी इरा आणि सिद्धार्थ सतत मजा मस्ती धमाल करत असतात. इन्स्टाग्रामवर बापलेकीचे मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ तो शेअर करत असतो. या दोघींचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसतात. सिद्धार्थ सोबत त्यांची मस्ती पाहायला चाहत्यांनाही आवडतं. नुकताच त्यानं मुलींसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची चर्चा

होतेय.

हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीनं लग्नाचा निर्णय सांगताच बावचळला अनिरुद्ध; खेळणार 'हा' नवा डाव

सिद्धार्थने इंस्टाग्रामवर मुलींसोबत एक रील बनवलं आहे. यामध्ये तो म्हणतोय, 'मित्रांनो आयुष्यात तीन गोष्टी कधीच करू नका.... घरच्यांच्या पसंतीने लग्न...स्वतःच्या मर्जीने लग्न आणि लग्न...' सिद्धार्थने मुलींसोबत केलेलं हे धमाल रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान , मध्यंतरी अभिनेता सिद्धार्थ जाधव हा लवकरच त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली होती. सिद्धार्थची पत्नी तृप्ती हिने सोशल मीडियावरुन जाधव हे सासरचं आडनाव हटवल्यानंतर ते दोघेही वेगळे घेणार असल्याचे बोललं जात होतं. तृप्ती हिने सोशल मीडियावर अक्कलवार हे तिचं माहेरचं आडनाव लावलं आहे. सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचे म्हटलं जात होतं. त्यामुळे लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र सिद्धार्थने एका वेबसाईटसोबत बोलताना या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. आणि ‘आमच्यात सर्व काही ठीक आहे’ असं म्हणत त्याने चाहत्यांच्या मनातील गैरसमज दूर केला होता.

सिद्धार्थ आणि तृप्तीने 2007 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. सिद्धार्थ आणि तृप्ती झलक दिखला जा या शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये तृप्ती आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

सिद्धार्थ जाधवनं मराठीसह हिंदी चित्रपट देखील काम केलं आहे. त्यानं आजवर राधे, सिम्बा आणि सर्कस  या चित्रपटात दिग्गज कलाकारांसोबत भूमिका साकारल्या आहे. भूमिका कोणतीय असो सिद्धार्थ त्याच्या अभिनयाने नेहमीचं प्रेक्षकांचं मन जिंकत असतो.

First published:

Tags: Marathi entertainment