Home /News /entertainment /

De Dhakka 2: 'शिवडीची केवढी इंग्लिश'; लंडनमध्ये शुटींगदरम्यान आपल्या सिद्धूची लागली वाट, पाहा धम्माल व्हिडीओ

De Dhakka 2: 'शिवडीची केवढी इंग्लिश'; लंडनमध्ये शुटींगदरम्यान आपल्या सिद्धूची लागली वाट, पाहा धम्माल व्हिडीओ

सगळ्यांचा लाडका अभिनेता सिद्धार्थचं जाधवचं अस्खलित इंग्रजी बोलतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दे धक्का 2 च्या शुटींगदरम्यानचा हा व्हिडीओ आहे.

  मुंबई, 05 ऑगस्ट: प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी 'दे धक्का 2' हा सिनेमा थिएटरमध्ये आज म्हणजेच 5ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. दे धक्काप्रमाणे दे धक्का 2 लाही प्रेक्षक उदंड प्रतिसाद देतील यात काही शंका नाही. दे धक्कामधील सगळ्या कलाकारांची बदलेली रुप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण सिनेमा लंडनमध्ये शुट करण्यात आला आहे. शुटींगदरम्यान कलाकारांनी चांगलीच धम्माल केली.  सिनेमा प्रदर्शित होताच सगळ्याचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधवनं म्हणजेच आपला सिद्धूनं एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. सिद्धू लंडनमध्ये शुटींग करत होता पण त्याला त्याच्या शिवडीची आठवण येत होती.  सिद्धार्थनं शेअर केलेला व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सिनेमाचं संपूर्ण शुटींग लंडनमध्ये झालेलं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अभिनेता सिद्धार्थ जाधव हा सर्वसामान्य घरातून आलेला मुलगा आहे. मुंबईच्या शिवडी भागात तो लहानाचा मोठा झाला. सिद्धार्थनं आपल्या अभिनयाच्या जोरावर शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण केलं. त्यामुळे शिवडी सिद्धार्थसाठी फार जवळची गोष्ट आहे. सिद्धार्थ जेव्हा दे धक्काच्या शुटींगसाठी लंडनला गेला तेव्हाही त्याला त्याच्या शिवडीची आठवण झाली. हेही वाचा - Sonalee Kulkarni : कधी कुठे कसा? लवकरच पार पडणार सोनाली-कुणालचा भव्य विवाह सोहळा, लग्नपत्रिका व्हायरल लंडनमध्ये जाऊन शुटींग करणं सगळ्यांसाठीचं चॅलेंज होतं. सिद्धूसाठीतर ते जास्तच होतं. कारण तिथे तिथल्या लोकांशी त्यांच्या भाषेत म्हणजेच इंग्रजी भाषेत बोलावं लागतं होतं. आणि सिद्धार्थसाठी हे चांगलंच कठीण होऊन बसलं होतं. शुटींगच्या सीन दरम्यान तिथल्या शुटींग क्रू बरोबर संवाद साधत असताना सिद्धार्थची मात्र चांगलीच वाट लागली. तिथल्या एका माणसाशी बोलताना सिद्धार्थचं इंग्रजी ऐकून सगळ्या सहकलाकारांनी त्याची चांगलीच मज्जा घेतली.
  व्हिडीओमध्ये सिद्धार्थ एका माणसाला 'तुम्हाला माझं बोलण समजत आहे का?', असं विचारताना दिसतोय.  तेव्हा समोरचा माणूस त्याल 'हो थोडं थोडं समजत आहे', असं म्हणतो. 'तुम्हाला कळतय ना पण मी इंग्रजी भाषेत बोलत असताना माझ्याबरोबरचे हे सगळे माझी मज्जा घेत आहे', असं सिद्धार्थ म्हणतो.  त्यावर मकरंद अनासपुरे सिद्धार्थला 'ही शिवडीची इंग्रजी आहे', असं म्हणताच सगळे हसू लागतात. सिद्धार्थ देखील ही गोष्टी मस्करीत घेत 'शिवडीची केवढी ती इंग्रजी', म्हणतं हसत सुटतो. सिद्धार्थनं शेअर केलेला हा धम्माल व्हिडीओ त्याच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.  दे धक्का 2 मध्ये सिद्धार्थच्या रुपात बदलेला धनाजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थचा तमाशा लाईव्ह हा सिनेमा देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला मात्र सिनेमाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या