मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Siddharth Jadhav : 'भावा ही तुझ्यासाठी "गोष्ट छोटी" असेल पण... प्रसिद्ध लेखकाला असं का म्हणाला सिद्धार्थ जाधव?

Siddharth Jadhav : 'भावा ही तुझ्यासाठी "गोष्ट छोटी" असेल पण... प्रसिद्ध लेखकाला असं का म्हणाला सिद्धार्थ जाधव?

सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थ जाधव

अभिनेता सिद्धार्थ जाधवनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात सिद्धार्थनं त्या व्यक्तीसाठी खास प्रेम व्यक्त केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  24 सप्टेंबर : अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. सिद्धार्थला आता सगळेच आपला सिद्धू म्हणून ओळखायला लागले आहेत.  सिद्धार्थ कायमच सोशल मीडियावर त्याची वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देत असतो. प्रत्येक कामाची अपडेट सिद्धार्थ सोशल मीडियावर देत असतो. सिद्धार्थनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकलीच मात्र त्याची मनं जिंकणारी काही मंडळी सिद्धार्थच्या आयुष्यात फार महत्त्वाची आहेत.  अशीच एक व्यक्ती सिद्धार्थला भेटली ज्याच्यासाठी सिद्धार्थनं खास पोस्ट शेअर केली आहे.

चला हवा येऊ द्या कार्यक्रमात पोस्टमनचं पत्र लिहिणारे प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप आणि सिद्धार्थ जाधव यांची अचानक भेट झाली. अरविंद यांनी चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून प्रेक्षाकांची मनं जिंकली. त्याचप्रमाणे अरविंद जगताप यांची 'मी पुन्हा येईन...' ही वेब सीरिजही प्लानेट मराठीवर रिलीज झाली. ज्यात भारत गणेशपुरे, सयाजी शिंदे यांच्यासह तगड्या कलाकारांनी काम केलं.

हेही वाचा - Ata Houde Dhingana : सिद्धार्थ जाधवचं भन्नाट इंग्रजी ऐकलंत का?, हसून हसून व्हाल लोटपोट

अरविंद जगताप सिद्धार्थला भेटताच त्याला प्रचंड आनंद झाला. त्यानं पोस्ट शेअर अरविंद त्याच्यासाठी किती खास आहेत हे लिहिलं आहे. सिद्धार्थनं म्हटलंय, 'अरविंद जगताप लेखक म्हणून उत्तमच आहे  हे सगळ्यांनाच माहीत आहे पण माणूस म्हणून पण कमाल आहे.  आज अचानक भेट झाली.  पण भेटीतला आपलेपणा मला खुप भावला. भावा ही तुझ्यासाठी "गोष्ट छोटी" असेल. पण माझ्यासारख्या तुझ्या फॅनसाठी "डोंगराएवढी" आहे'.

अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या स्टार प्रवाहवरील आता 'होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करत आहे. हा शो पहिल्या दोन आठवड्यातच टॉप 5 मध्ये आला आहे. सिद्धार्थ त्याच्या हटके स्टाइलनं हा शो होस्ट करताना दिसत आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment