मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

De Dhakka 2 हाऊसफुल झाल्यानं सिद्धार्थ जाधवनं प्रेक्षकांना दिलं अनोखं गिफ्ट, पाहा VIDEO

De Dhakka 2 हाऊसफुल झाल्यानं सिद्धार्थ जाधवनं प्रेक्षकांना दिलं अनोखं गिफ्ट, पाहा VIDEO

14 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'दे धक्का' चित्रपटाचा सिक्वेल ‘दे धक्का 2’ आता प्रदर्शित झाला आहे. दे धक्काच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला पहायला मिळत आहे.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 8 ऑगस्ट : मराठीतील असे अनेक चित्रपट आहे ज्या चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तुंग प्रतिसाद दिलेला पहायला मिळाला. त्यानंतर त्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठीही प्रेक्षकांनी मागणी केली. यातील एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे 'दे धक्का' (De Dhakka 2). दे धक्का चित्रपटाला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर आता त्याचा दुसरा भाग  प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 5 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेला पहायला मिळाला. याचीच एख झलक अभिनेता सिद्धार्थ जाधवनं व्हिडीओ शेअर करत दाखवली आहे. 14 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'दे धक्का' चित्रपटाचा सिक्वेल ‘दे धक्का 2’ आता प्रदर्शित झाला आहे. दे धक्काच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचं मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळतंय. थिएटरमध्ये प्रेक्षकांची हाऊसफुल गर्दी केलेली पहायला मिळाली. थिएटर हाऊसफुल झाल्याचा एक व्हिडीओही सिद्धर्थ जाधवनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याशिवाय सिद्धार्थनं थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांना सरप्राइजही दिल्याचं पहायला मिळालं.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थनं सांगितलं की, 'संपूर्ण महाराष्ट्रभर 'दे धक्का 2' प्रदर्शित झाला आहे. चित्रपट हाऊसफुल झाला असून धिंगाना प्रतिसाद पहायला मिळतोय. धिंगाना ऑडियन्स आहे, धिंगाना पब्लिक आहे, धिंगाना रिसपॉन्स आहे'. त्यानंतर सिद्धार्थनं थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांना सरप्राइज दिलं आहे. सिद्धार्थला थिएटरमध्ये पाहताच प्रेक्षकांनी ओरडायला सुरुवात केली. हेही वाचा -  Masoom Sawaal: सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो; 'मासूम सवाल' च्या पोस्टरवर होतेय टीका दरम्यान, 'दे धक्का 2' मध्ये धनाजीची भूमिका सिद्धार्थ जाधवनं साकारली आहे. त्याच्या या भूमिकेला चित्रपटाच्या पहिल्या भागतही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलमध्येही त्याची भूमिका लोकप्रिय ठरत आहे.
First published:

Tags: Instagram post, Marathi cinema, Marathi entertainment, Social media

पुढील बातम्या