Home /News /entertainment /

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या गाण्यावर लेक इरानं धरला ठेका, पाहा VIDEO!

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या गाण्यावर लेक इरानं धरला ठेका, पाहा VIDEO!

सिद्धार्थनं (Siddharth jadhav daughter)मुलगी स्वराच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याची पत्नीही दिसत आहे.

  मुंबई, 28 जून : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav)निरनिराळ्या कारणांवरुन चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ खाजगी कारणांमुळे (siddharth jadhav latest news)चर्चेत आला आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती घटस्फोट घेणार (siddharth jadhav & trupti divorce rumors) अशा चर्चांना उधाण आलं होतं. सोशल मीडियावर ही बातमी तुफान व्हायरल होत होती. त्यानंतर सिद्धार्थनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला(siddharth instagram post). तृप्ती (Trupti desai) आणि त्याची लेकही या फोटोमध्ये पहायला मिळाली. त्यामुळे घटस्फोटांच्या अफवांना काहीसा पूर्णविराम मिळाला. सिद्धार्थनं (Siddharth jadhav daughter)मुलगी स्वराच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सिद्धार्थची मुलगी इरा ( Ira Jadhav) डान्स करताना दिसत आहे. इरानं सिद्धार्थचा आगामी सिनेमा तमाश लाईव्ह यातील गाण्यावर ठेका धरला असून मस्त मजेचा माहोल पहायला मिळतोय. 'बापलेकीची मज्जा' असा हॅशटॅगही सिद्धार्थनं व्हिडीओमध्ये वापरला आहे. हा व्हिडीओ व्यवस्थित पाहिला तर यामध्ये तृप्ती देखील दिसत आहे. त्यामुळे आणखी एकदा सिद्धार्थ आणि तृप्ती सोबत असल्याचं पहायला मिळालं. दोघेसोबत जरी झळकत असले तरी अद्याप दोघांनी यावर अधिकृतरित्या काही वक्तव्य केलेलं नाही. हेही वाचा - Abhinay Berde: अभिनेत्री सायली संजीव बनली अभिनयची फोटोग्राफर, London मध्ये काढले धमाल फोटो! इरा नाचत असलेलं गाणं सिद्धार्थचा आगामी चित्रपट ‘तमाशा LIVE’ मधलं आहे. याशिवाय हे रॅप साॅंग सिद्धार्थनं स्वतः गायलं आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून अनेक प्रतिक्रियाही व्हिडीओवर येताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी इराच्या क्यूट डान्सवर कमेंट केल्या आहेत आणि छोट्याशा इराचं कौतुकही केलं आहे.
  दरम्यान, सिद्धार्थ जाधव एक उत्तम अभिनेता असून त्यानं मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटांत काम केलं आहे. दोन्ही ठिकाणी त्यानं आपल्या अभिनयानं चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सिद्धार्थनं त्याच्या हटके शैलीनं एक वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. लवकरच सिद्धार्थ 'तमाशा लाईव्ह' आणि 'दे- धक्का 2' या दोन्ही चित्रपटांत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटांसाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Instagram, Instagram post, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या