सिद्धार्थ चांदेकर या व्हिडिओच्या सुरूवातीला म्हणत आहे की, सो गायज आता आपण पाहणार आहे की.... एवढ्यात त्याच्या तोंडावर त्याची बायको म्हणजे मिताली जोरात टॉवेल फेकते आणि आतून बाहेर येते ओ म्हणते की...मी काय सांगितले आहे तुला गादीवर ओला टॉवेल टाकू नको. यावर सिद्धार्थ म्हणतो थोडावेळासाठी टाकला होता......यावर मिताली म्हणते की....गादी ओली झाली आहे. त्यावर तो लगेच म्हणतो की,मी व्हिडिओ बनवत आहे ..तर मिथाली देखील म्हणते ..व्हिडिओ बनवतो मान्य आहे..पण अंघोळ केल्यानंतर टॉवेल हुकवर लावता येत नाही का..यावर सिद्धार्थ म्हणतो की, काय फालतूगिरी लावली आहे..तर मिताली देखील म्हणते म्हणजे मी फालतूगिरी लावली आहे..आणि जोराने shut up असे म्हणते..त्यावेळी सिद्धार्थ मध्येच तिचा मूड बदलण्यासाठी गाण म्हणत डान्स करतो मात्र त्याचा काय परिणाम होत नाही आणि तो निघून जातो. वाचा : साडी नेसून बिनधास्त डान्स? बडी मुशकिल बाबा... असं वाटत असेल तर अमृता-सोनालीचा हा VIDEO पाहाच खर तर सिद्धार्थने शेअर केलेला हा व्हिडिओ प्रत्येक घराशी व जोडप्याशी रिलेट करणारा असाच आहे. बऱ्याचवेळा अशा लहान गोष्टींवर खटके उडत असतात पण त्यात एक गंमत असते. त्यामुळे शेवटी काय कहानी घर घर की..प्रत्येक घरात दररोज असा एक तरी सीन होतच असतो. वाचा : Navratr च्या सातव्या दिवशी मराठमोळी 'ही' अभिनेत्री नटली चंद्रपूरच्या महाकाली देवीच्या रुपात व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते. यानंतर सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी 24 जानेवारी 2021ला लग्नगाठ बांधली. मिताली आणि सिद्धार्थ या जोडीचे लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे व लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तसेच त्यांच्या लग्नातील लूकची देखील सोशल मीडियावर रंगली होती.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials