• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'हा दिवस स्पेशल'; झिम्मा सिनेमासाठी सिद्धार्थ चांदेकरने स्वतः विकली तिकिटे

'हा दिवस स्पेशल'; झिम्मा सिनेमासाठी सिद्धार्थ चांदेकरने स्वतः विकली तिकिटे

महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये 19नोव्हेंबरला ‘झिम्मा’ (Jhimma movie) चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये 19नोव्हेंबरला ‘झिम्मा’ (Jhimma movie) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' चित्रपटाचा विषय वेगळ्या धाटणीचा आहे. वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवतात आणि मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात. मग तिकडे काय धम्माल होते, हे प्रेक्षकांना झिम्मा'मधून पाहायला मिळत आहे. या सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. म्हणूनच सिद्धार्थ चांदेकरने या सिनेमासाठी चक्क तिकीट खिडकीवर जाऊन तिकीटे विकली. याचा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिद्धार्थ चांदेकरने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो चक्क तिखीट खिडकीवर सिनेमाची तिकिटे विकताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याला तिकिटे विकताना पाहून प्रेक्षकांना देखील सुखद धक्का बसला. यावेळी एका चाहतीचे तर त्याच्याकडून तिकिटे विकत घेताना हात थरथर कापत होते. तर काहींनी त्याच्यासोबत सेल्फी देखील काढला.
  सिद्धार्थ चांदेकरने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की,पूजा मधुबनची जादुई सिंगल स्क्रीन! पुण्यात लहानपणी रांगेत उभा राहून तिकिटे काढली, डोंबिवलीत आज माझ्या सिनेमाची तिकिटे स्वतः लोकांना दिली. हा दिवस स्पेशल राहणार. थँक यु झिम्मा!..यावेळी त्याच्यासोबत सिनेमात दिग्दर्शक हेमंत ढोमे देखील उपस्थित होता. वाचा :  झी मराठीवर लवकरच सुरू होणार नवा शो 'किचन कल्लाकार' ; संकर्षण कऱ्हाडे दिसणार नव्या भूमिकेत ‘झिम्मा’ या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांचे आहे. तर क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, उर्फी काझमी, विराज गवस, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे मराठी सिनेरसिकांसाठी 'झिम्मा' हा चित्रपट पर्वणीच आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: