Home /News /entertainment /

VIDEO: ‘ससुराल गेंदा फूल’ म्हणत सिद्धांत चतुर्वेदीने हटक्या अंदाजात #ViCat ला दिल्या शुभेच्छा!

VIDEO: ‘ससुराल गेंदा फूल’ म्हणत सिद्धांत चतुर्वेदीने हटक्या अंदाजात #ViCat ला दिल्या शुभेच्छा!

Siddhant Chaturvedi

Siddhant Chaturvedi

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  मुंबई, 13 डिसेंबर: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नानंतर (Vicky Kaushal Katrina Kaif wedding) त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, रविवारी, अभिनेता आणि 'फोन भूत' सह-कलाकार सिद्धांत चतुर्वेदीने(Siddhant Chaturvedi) देखील एका खास पद्धतीने या नवविवाहित जोडप्याचे शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धांत चतुर्वेदीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो 'दिल्ली 6' मधील 'ससुराल गेंदा फूल' या सुपरहिट गाण्यावर नाचताना दिसत आहे. सिद्धांतने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. अनेक युजर्स कमेंट्सद्वारे सिद्धांतच्या डान्सचे कौतुक करत आहेत आणि लग्नाच्या शुभेच्छा देण्याची ही स्टाइल विकी-कतरिनाला आवडली असे म्हणत आहेत. व्हिडिओ शेअर करताना सिद्धांत चतुर्वेदीने एक मजेशीर कॅप्शनही दिली आहे. 'ये ससुराल गेंदा फूल मुबारक हो कतरिना कैफ. विकी पाजीची बाराटी चुकली होती, पण उणीव अजिबात जाणवणार नाही. तुम्हा दोघांना वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हा दोघांनी संपूर्ण भारतात लग्नाचा मूड तयार केला आहे. असे सांगत सिद्धांतने तुम्हा दोघांना कुणाची नजर लागू नये असेदेखील म्हटले आहे.'
  दोघांचा 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे लग्नसोहळा पार पडला. लग्नबेडीत अडकल्यानंतर दोघे लग्नसोहळ्याचे फोटो आपल्या सोशल अकाउंटवर शेअर करताना दिसत आहेत. सर्वात प्रथम त्यांनी सात फेरे घेत असलेले फोटो शेअर केले. दोघांचा हा ग्रँड विवाह सोहळा सध्या देशासह जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal, Wedding

  पुढील बातम्या