मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मिमिक्री आर्टिस्ट ते सुपरस्टार अभिनेता; पाहा गल्ली बॉय फेम सिद्धांत चर्तुवेदीचा प्रेरणादायी प्रवास

मिमिक्री आर्टिस्ट ते सुपरस्टार अभिनेता; पाहा गल्ली बॉय फेम सिद्धांत चर्तुवेदीचा प्रेरणादायी प्रवास

वडिलांसाठी केलं सी.ए. अन् स्वत:साठी करतोय अभिनय; पाहा सिद्धांत चर्तुवेदीचा थक्क करणारा प्रवास

वडिलांसाठी केलं सी.ए. अन् स्वत:साठी करतोय अभिनय; पाहा सिद्धांत चर्तुवेदीचा थक्क करणारा प्रवास

वडिलांसाठी केलं सी.ए. अन् स्वत:साठी करतोय अभिनय; पाहा सिद्धांत चर्तुवेदीचा थक्क करणारा प्रवास

मुंबई 29 एप्रिल: सिद्धांत चर्तुवेदी (Siddhant Chaturvedi) हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. आज सिद्धांतचा वाढदिवस आहे. 27 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (siddhant chaturvedi birthday) आपल्या अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर त्यानं बॉलिवूडमध्ये अल्पावधित स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आज यशाच्या शिखरावर असलेला हा अभिनेता कधीकाळी सेलिब्रिटींची मिमिक्री करुन आपलं पोट भरत होता. (Success Stories Siddhant Chaturvedi) मात्र गल्ली बॉय या चित्रपटामुळं तो रातोरात सुपरस्टार झाला. पाहूया त्याचा थक्क करणारा प्रवास…

सिद्धांतचा जन्म 29 एप्रिल 1993 साली उत्तर प्रदेशमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. वयाच्या पाचव्या वर्षी तो मुंबईत आला. वडील सी.ए. होते त्यामुळं त्याच्या घरात अकाउंट्सचं वातावरण होतं. परंतु सिद्धांतला मात्र अभ्यासात फारसा रस नव्हता. त्याला अभिनेता व्हायचं होतं. परंतु वडिलांच्या हट्टामुळं त्याला सी.ए. करावं लागलं. याच दरम्यान अभिनयाच्या वेडामुळं वडिलांनी त्याचा पॉकेटमनी देखील थांबवला होता. त्यामुळं पैशांसाठी तो मिमिक्री आणि स्टँडअप कॉमेडी करत होता. शिवाय चित्रपटांसाठी ऑडिशन देखील देत होता. याच दरम्यान 2016 साली लाईफ सही है या मालिकेत एक लहानशी भूमिका साकारण्याची संधी त्याला मिळाली. अन् तेथून त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली.

‘नागडे राजकारणी...नागडं सरकार...नागडा देश....’; आस्ताद काळे संतापला

पुढे त्यानं अनेक मालिका आणि वेब सीरिजमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारल्या. सिद्धांतला खरी लोकप्रियता मिळाली ती रणवीर सिंगच्या गल्ली बॉय या चित्रपटामुळं. या चित्रपटात त्यानं साकारलेली एम.सी. शेर ही भूमिका तुफान गाजली. अनेक समिक्षकांच्या मते त्याच्या अभिनयासमोर रणवीरचा अभिनय फिका वाटत होता असं म्हटलं होतं. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार देखील मिळाला होता. येत्या काळात तो बंटी और बबली 2 आणि फोनबुथ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. अशा प्रकारे एक मिमिक्री आर्टिस्ट झाला सुपरस्टार.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment