मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mirzapur 2 मध्ये गोलूच्या हातात बंदूक; श्वेता त्रिपाठीने सांगितली अ‍ॅक्शन अवतारामागील गोष्ट

Mirzapur 2 मध्ये गोलूच्या हातात बंदूक; श्वेता त्रिपाठीने सांगितली अ‍ॅक्शन अवतारामागील गोष्ट

Mirzapur पहिल्या सिझनमधील शांत गोलू गुप्ता (golu gupta) म्हणजे श्वेता त्रिपाठी (Shweta tripathi) Mirzapur 2 मध्ये वेगळ्याच अवतारात दिसली.

Mirzapur पहिल्या सिझनमधील शांत गोलू गुप्ता (golu gupta) म्हणजे श्वेता त्रिपाठी (Shweta tripathi) Mirzapur 2 मध्ये वेगळ्याच अवतारात दिसली.

Mirzapur पहिल्या सिझनमधील शांत गोलू गुप्ता (golu gupta) म्हणजे श्वेता त्रिपाठी (Shweta tripathi) Mirzapur 2 मध्ये वेगळ्याच अवतारात दिसली.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 23 ऑक्टोबर : मिर्झापूर (Mirzapur) वेबसीरिजचा (web series) दुसरा सीझन आज रिलीज झाला. आधीच्या सिझनमध्ये बंदूक हातातही न घेणारी गोलू  गुप्ता Mirzapur 2 मध्ये  हातात बंदूक घेऊन गुंडांना ठार करताना दिसली. गोलू गुप्ताची भूमिका साकारणाऱ्या श्वेता त्रिपाठीनं (shweta tripathi) तिच्या या अ‍ॅक्शन अवतारामागील गोष्ट सांगितली आहे. आपल हा अ‍ॅक्शन अवतार एका हॉलिवूड अभिनेत्रीमुळे दिसला असं ती म्हणाली.

पहिल्या सिझनमधील शांत आणि अहिंसक अशी गोलू दुसऱ्या सिझनमध्ये हिंसा करताना दिसते. आपली बहीण स्विटी आणि बबलू पंडित यांच्या मृत्यूचा बदला घेण्यास तयार गोलूने स्वतःमध्ये हिंसाचाराच्या एका वादळाचा जागर केला आहे.

श्वेता म्हणाली, मिर्झापूरचा दुसरा सिझन माझ्यासाठी एक अतिशय अनोखा अनुभव होता. मी कधीच असा विचारही केला नव्हता की मला अशी कोणती भूमिका साकारता येईल. गोलू ही नेतृत्व करणारी महिला आहे. प्रतिकूल परिस्थितीत तिचा छळ किंवा संघर्ष होऊ शकत नाही. गोलूची जगण्याची ऊर्जा मी माझ्या भूमिकेसाठी स्वत:मध्ये जागवली. गोलूमध्ये रागासह एक उद्दिष्ट आहे.

हे वाचा - नेहा कक्करच्या हातावर रोहनप्रीत सिंहच्या नावाची मेहंदी; लग्नाआधीचे PHOTO VIRAL

श्वेताने दुसऱ्या सिझनमधील गोलू गुप्ता साकारण्यासाठी तिच्यात लपलेल्या थुरमनला जागृत केलं, असं तिनं सांगितलं.

क्वेनटीन टॅरंटिनोच्या पॉप क्लासिक फिल्म मालिका 'किल बिल' मधल्या बिएट्रिक्स किड्डो या अॅक्शन हिरोइनची भूमिका थुरमनने साकारली होती ती प्रचंड गाजली होती. हे चित्रपट आणि या चित्रपटातील थुरमनच्या भूमिकेमुळे आपल्याला मिर्झापूरमधील गोलू गुप्ताच्या भूमिकेसाठी  प्रेरणा मिळाल्याचं श्वेतानं सांगितलं.

हे वाचा - बाहुबलीच्या वाढदिवसालाच राजमौलींच्या RRR चा लुक जाहीर! अजय देवगण, आलियाही चमकणार

मिर्झापूरचा पहिला भाग 2018 मध्ये रीलिज झाला होता. सामान्य घरातून आलेल्या 2 भावांना चुकीचे निर्णय आणि परिस्थितीमुळे कशाप्रकारे गुन्हेगारी विश्वामध्ये ढकललं जातं याची कथा यामध्ये दाखवण्यात आली होती. मिर्झापूरच्या  पहिल्या भागामध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Triapathi), विक्रांत मेस्सी (Vikrant Massey), अली फजल (Ali Fazal), श्रेया पिळगावकर (Shreya Pilgaonkar), श्वेता त्रिपाठी (rasika Dugal) रसिका दुग्गल यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. मिर्झापूर 2 मध्ये  विजय शर्मा, प्रियांशु पेनयुली, इशा तलवार अशा नव्या कलाकारांनीही काम केलं आहे. त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे कथानकांमध्ये अधिक ट्विस्ट आला आहे.

First published:

Tags: Web series