मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

वर्कआउटसाठी डंबेल्सऐवजी लहान भावाचा वापर, लॉकडाऊनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीचा VIDEO व्हायरल

वर्कआउटसाठी डंबेल्सऐवजी लहान भावाचा वापर, लॉकडाऊनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीचा VIDEO व्हायरल

सध्या लॉकडाऊनच्या काळात सर्वच कलाकार आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. श्वेता तिवारी सुद्धा तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 08 एप्रिल : अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) विविध कारणांसाठी चर्चेत असते. अनेकदा मायलेकींचे फोटो व्हायरल झाले आहेत. पलकचे काही बोल्ड फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या पलकचा एक खूप फनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिची आई श्वेताला वर्कआउट करायला शिकवत आहे. आणि हे वर्कआउट नेहमीसारखं साधसुधं वर्कआउट नाही तर फार मजेशीर आहे. तुम्हाला जर हे वर्कआउट करायचं असेल तर घरातील लहान मुलाला हाताशी घेऊन तुम्ही सुद्धा प्रयत्न करू शकता. (हे वाचा-दोन्ही लेकी कोरोना पॉझिटिव्ह, मुलींनतर बॉलिवूडचा निर्माता COVID-19 च्या विळख्यात) पलकने तिच्या 3 वर्षाच्या भावाला उचलून धरत हे वर्कआउट केले आहे. ज्यामध्ये ती मजेशीट टीप्स देखील श्वेता तिवारीला देताना दिसते आहे. हा व्यायामप्रकार करताना कदाचित पलकला मज्जा वाटली असेल, पण तिच्या भावाचे मात्र फार हाल झालेले या व्हिडीओमध्ये दिसले.  सध्या लॉकडाऊनच्या काळात सर्वच कलाकार आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. श्वेता तिवारी सुद्धा तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते.
View this post on Instagram

A quick demonstration of my daily upper body workout by @palaktiwarii #nanhayatri 💪🏼💪🏼💪🏼😂😅

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

पलक आणि रेयांशचा हा व्हिडीओ श्वेता तिवारीने शेअर केला आहे. 'माझ्या अप्पर बॉडी वर्कआउटसाठी पलकने दिलेलं डेमोन्स्ट्रेशन' असं कॅप्शन देत श्वेता तिवारीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. पलक तिच्या भावाबरोबर अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पलक आणि रेयांश सावत्र भावंड असली तरी दोघांमध्ये मस्त बाँडिंग आहे. पलक श्वेताचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे तर रेयांश अभिनव कोहलीचा मुलगा आहे. संपादन- जान्हवी भाटकर
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या