मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीकडे नाहीयेत पैसे? मुलगी पलकला कळताच दिली अशी प्रतिक्रिया

Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीकडे नाहीयेत पैसे? मुलगी पलकला कळताच दिली अशी प्रतिक्रिया

श्वेता तिवारी

श्वेता तिवारी

अभिनेत्री श्वेता तिवारीचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  28 सप्टेंबर : टेलिव्हिजनची प्रसिद्धी अभिनेत्री श्वेता तिवारी सतत काही ना काही कारणासाठी चर्चेत असते. श्वेता सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिथे ती अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या रिल्स व्हिडीओना चांगले व्ह्यूज देखील पाहायला मिळतात. श्वेता अनेक फनी व्हिडीओ शेअर करत असते. पण नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्याकडचे पैसे संपले असल्याचं सांगत आहे. आपल्याकडचे पैसे संपल्याचं तिनं जेव्हा तिच्या मुलीला सांगितलं तेव्हा तिनं दिलेली प्रतिक्रिया पाहून श्वेता स्वत: देखील हैराण झाली आहे.

श्वेतानं एक  रिल व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिला विचारलं जात की तुमच्याकडे पैसे नसण्याचं कारण काय आहे? त्यावर श्वेता तोंड वाकडं करत मागे बसलेल्या मुलीकडे कॅमेरा फिरवते. श्वेतानं शेअर केलेल्या व्हिडीओ लेक पलक मोबाईल पाहण्यात बिझी आहे.  व्हिडीओ जरी मजेशीर असला तरी श्वेतानं आपले पैसे संपण्यासाठी आपल्या मुलीला जबाबदार ठरवलं आहे. श्वेताच्या या टोमण्यावर पलकनं मात्र कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा - Bhabi Ji Ghar Par Hai: धक्कादायक 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याच्या मुलाचं अवघ्या 19 वर्षी निधन

'आता तुम्हा सगळ्यांना कळलं असेल', असं कॅप्शन देत श्वेतानं हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पलकनं काही प्रतिक्रिया दिली नसली तरी पोस्टच्या कमेंटमध्ये लेकीनं आईला चांगलंच उत्तर दिलं आहे.  'आई प्लिज तू खोटं बोलू नकोस', असं उत्तर पलकनं दिलं आहे. लेकीचं उत्तर ऐकून श्वेता देखील हसताना दिसत आहे.  आई आणि लेकीचा हा फनी व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांनी देखील एन्जॉय केला आहे.

श्वेता आणि तिची लेक पलक यांच्यातील बॉडिंग कसं आहे याचा प्रत्येत वेळोवेळी आला आहे. त्याविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही.  अनेकांनी माय लेकीच्या व्हिडीओला पसंती दिली आहे.

श्वेता सध्या अपराजिता या नव्या शोमध्ये काम करत आहे. यात ती लेडी बॉसच्या अंदाजात दिसत आहे. यातही ती सिंगल मदर म्हणून भूमिका निभावत आहे.ती 3 मुलींची आहे आहे.  हा शो प्रेक्षकांनाही देखील आवडत आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News