क्वारंटाईनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीनं शेअर केले Hot Photos, चाहत्यांनी विचारलं...

पलक तिवारीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

पलक तिवारीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 29 मार्च : कोरोना व्हायरसनं आजकाल लोकांचं जगणं कठीण करुन सोडलं आहे. एकीकडे सर्व सेलिब्रेटी सोशल मीडियावरून सर्वांना घरी राहण्याचा सल्ला देताना दिसत आहेत तर दुसरीकडे अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी मात्र सतत सोशल मीडियावर हॉट आणि स्टायलिश फोटो शेअर करताना दिसत आहे. आताही पलकनं काही असे फोटो शेअर केले आहेत. जे पाहिल्यावर तिच्या चाहत्यांना आई श्वेता तिवारीची आठवण आली. पलक तिवारीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये पलक ब्लॅक क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये दिसत आहे. ती बाल्कनीमध्ये उभी असून या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. पण तिचे हे फोटो पाहिल्यावर तिला चाहत्यांनी काही विनोदी प्रश्न विचारले आहेत. एका युजरनं तर तिला तुझी आई कुठे आहे असा प्रश्न विचारला आहे. क्वारंटाईनमध्येही विरुष्काचा रोमान्स सुरू, विराटसाठी अनुष्का झाली हेअरस्टायलिस्ट
   
  View this post on Instagram
   

  Watch out for the green sky

  A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

  पलक तिवारी काही दिवसांपूर्वी तिच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. ज्यात तिचा लुक डब्बू रत्नानीनं केलेल्या कियारा अडवाणीच्या फोटोशूटशी मिळता-जुळता होता. तिचं हे फोटोशूट क्रिस राठोडनं केलं होतं. ज्यामुळे पलकनं कियाराचा लुक केल्याचं बोललं जात होतं. याशिवाय पलकचे तिच्या मामाच्या लग्नातील काही फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. SHOKING! कनिका कपूरच्या अडचणीत वाढ, तिसरी कोरोना टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह
   
  View this post on Instagram
   

  Jungle madness Shot by the amazing @chrisrathore.photo

  A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

  पलक तिवारी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र तिनं या सर्व गोष्टी केवळ अफवा असल्याचं सांगितलं होतं. सध्या तरी माझा असा कोणताही प्लान नसल्याचं तिनं म्हटलं होतं. पलक तिवारीचा स्टारडम कोणत्याही बॉलिवूड स्टार किड्सपेक्षा कमी नाही. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून नेहमीच आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. जीवघेण्या Coronavirus वर सुश्मिता सेननं सुचवलं 100% गुणकारी औषध!
  First published: