Home /News /entertainment /

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; AIIMS च्या रिपोर्टनंतर बहीण श्वेता किर्ती सिंह म्हणाली...

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; AIIMS च्या रिपोर्टनंतर बहीण श्वेता किर्ती सिंह म्हणाली...

सुशांत सिंह राजपूतची (sushant singh rajput) हत्या झाली असा आरोप सुशांतच्या कुटुंबाने केला होता. मात्र AIIMS च्या डॉक्टरांनी या थेअरीला नकार दिला आहे.

    मुंबई, 03 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नाही तर ती आत्महत्याच आहे, असा रिपोर्ट दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) दिला. हा रिपोर्ट या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  AIIMS च्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतने आत्महत्या केली, असा रिपोर्ट एम्सने दिल्यानंतर सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. फक्त दोन शब्दांमध्ये तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. श्वेता म्हणाली, "आम्ही जिंकणार". इतक्या महिन्यांपासून भावासाठी लढाई लढणाऱ्या श्वेताला आपल्या भावाला न्याय मिळेल असा विश्वास कायम आहे. 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. सुरुवातील या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली, असं स्पष्ट केले होते. परंतु, सुशांतने आत्महत्या केली नसून हत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला.  सुशांतच्या गळ्यावर असलेले ligature मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ आणि इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असं म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे. हे वाचा - सत्य कधीच बदललं जाऊ शकत नाही, रिया चक्रवर्तीच्या वकिलाची प्रतिक्रिया दरम्यान सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी रिया आणि सुशांतची भेट झाली होती, हे सांगणारा साक्षीदार सापडला आहे. सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंहने हा मोठा खुलासा केला आहे. श्वेता किर्ती सिंहने एक ट्वीट केलं. "रिया माझ्या भावाला 13 जूनच्या रात्री भेटली होती, हे सांगणारा एक साक्षीदार आहे. 13 जूनच्या रात्री नेमकं काय झालं होतं, ज्यानंतर दुसऱ्या दिवशी 14 जूनला सकाळी माझा भाऊ मृतावस्थेत सापडला?", असं ती म्हणाली होती.
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या