मुंबई, 11 डिसेंबर : आपल्या दमदार अभिनयानं बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. श्वेतानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ती पती रोहित मित्तल याच्यासोबत घटस्फोट घेत असल्याचा खुलासा केला. रोहित हा निर्मात असून श्वेता आणि रोहित मागच्याच वर्षी डिसेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. मात्र आता हे दोघंही एकमेकांच्या संमतीनं वेगळे होत असल्याचं श्वेतानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
श्वेता बासू प्रसादनं ‘मकडी’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. तिची घटस्फोट घेण्याची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये श्वेतानं घटस्फोटाचं कारण सांगतानाच रोहित मित्तलनं तिला नेहमीच प्रेरित केल्याबद्दल अनेक गोड आठवणी दिल्याबद्दल त्याचे आभारही मानले आहेत.
लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला विराट-अनुष्काची भावुक पोस्ट, पाहा UNSEEN PHOTO
View this post on Instagram
अभिनेत्री श्वेता बासू प्रसादनं लिहिलं, रोहित मित्तल आणि मी एकमेकांच्या संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक महिने विचार करुन आणि एकमेकांचं हित लक्षात घेऊन आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत.
View this post on Instagram
तिनं पुढे लिहिलं, प्रत्येक पुस्तक वाचणं शक्य नसतं याचा अर्थ असा नाही की ते पुस्तक खराब आहे किंवा ते कोणी वाचणारच नाही. काही गोष्ट अपूर्ण सोडणंच हिताचं असतं.
OMG! सिनेमाच्या शूटिंगमुळे नाही तर या आजारामुळे सलमान सोडतोय बिग बॉस
वयाच्या 12 व्या वर्षीच दिलीप कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ही अभिनेत्री