मुंबई 25 जून : 2004 साली आलेल्या ‘श्वास’ (Shwas) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं होत. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात. आजोबा - नातवाच सुंदर नातं या चित्रपटात रेखाटलं आहे. यातील लहान नातवाची भूमिका विशेष लोकप्रिय झाली होती.
अभिनेते अरुण नलावडे (Arun Nalawade) यांनी आजोबांची भूमिका साकारली होती तर बालकलाकार अश्विन चितळे (Ashwin Chitale) याने नातवाची भूमिका साकारली होती. आश्विनचा अभिनय अक्षरशः सगळ्यांनाच रडवून गेला होता. इतकचं नव्हे तर तब्बल 50 वर्षांनंतर मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.
चित्रपटातील हा लहानगा म्हणजेच परश्या आता कसा दिसतो माहीत आहे का? अश्विन आता मोठा झाला असून तो पुण्यात राहतो. अश्विन हा मूळचा पुण्याचाच आहे. तर त्याचं संपूर्ण शिक्षणही पुण्यातच झालं आहे. टिळक महाराष्ट्र महाविद्यालयातून त्याने इंडोलॉजी ही पदवी घेतली आहे.
श्वास चित्रपटाच्या यशानंतर अश्विनला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. काही चित्रपटांत त्याने कामही केलं. हिंदीतही त्याला काम करण्याची संधी मिळाली. पण ती बालकलाकार म्हणूनच. ‘आहिस्ता आहिस्ता’ , ‘जोर लगाके हैय्या’ , ‘टॅक्सी नं 9211’, ‘देवराई’ या चित्रपटांत तो दिसला होता. पण अश्विन आता चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
हे कलाकार कुठे हरवले? कधीकाळी सुपरहिट चित्रपटांमुळे होते चर्चेत
अश्विन सध्या एक ट्रॅव्हल्स अँड टुर्स (Travel and Tours) कंपनी चालवतो. देशभरात पर्यटकांना निरनिराळी स्थळ दाखवण्याचं काम त्याची ही कंपनी करते. त्यामुळे अश्विन आता अभिनेत्यासोबत एक उद्योजक देखील आहे.
महेश मांजरेकरांची तिसरी कन्या पाहिलीत का? आहे अतिशय ग्लॅमरस
श्वास चित्रपटानंतर अश्विनच्या आयुष्याला मोठी कलाटनी मिळाली होती. कोकणात खेड्यात राहणारे आजोबा आपल्या कॅन्सग्रस्त नातवाला बरं करण्यासाठी जीवाची बाजी लावतात. अशी एकंदरीत चित्रपटाची कथा होती. प्रेक्षकांच्या डोळ्यात भलेमोठे अश्रु आणणारा हा चित्रपट ठरला होता. पण अश्विनने आता लाईमलाइटपासून दूरच रहाणं पसंत केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.