शुभदा वराडकरांच्या ओडिसी नृत्याची मुंबईकरांसाठी खास 'मेजवानी'

या कार्यक्रमात जर तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. या कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2017 06:59 PM IST

शुभदा वराडकरांच्या ओडिसी नृत्याची मुंबईकरांसाठी खास 'मेजवानी'

15 नोव्हेंबर : ओडिसीच्या प्रसिद्ध नृत्यांगना, लेखक आणि कोरिओग्राफर शुभदा वराडकर यांच्या ओडिसी नृत्याचा विशेष कार्यक्रम मुंबईकरांना अनुभवता येणार आहे.

ओडिसीची प्रसिद्ध नृत्यांगना, लेखक आणि कोरिओग्राफर शुभदा वराडकर यांच्याबद्दल आपण सगळेच जाणतो. त्यांची दुसरी ओळख म्हणजे भारतीय वंशाचे आणि कोकणातले भूमिपूत्र आर्यलंडचे पंतप्रधान लियो वराडकर यांच्या बहीण आहेत. त्या अप्रतिम नृत्य करतात. त्यांचं ओडिसी नृत्य पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. पण आता त्यांचं देखणीय नृत्य पाहण्याची संधी मुंबईकरांनाही मिळणार आहे. 'डांन्स अॅन्ड बियोन्ड' या कार्यक्रमासाठी शुभदा यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. 17 नोव्हेंबरला हा कार्यक्रम मुंबईत होणार आहे. फोर्टच्या किताब खान्यात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमात जर तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. या कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश आहे. ''http://www.junoontheatre.org'' या वेबसाईटवरुन तुम्ही बुकिंग करु शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 06:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...