सुबोध भावे बायकोला का घाबरतो?

सुबोध भावे बायकोला का घाबरतो?

सुबोध भावे, श्रुती मराठे, गिरीश ओक, निर्मिती सावंत असे तगडे कलाकार या सिनेमात आहेत. आणि मुख्य कलाकार सुबोध भावे लग्नाला घाबरतोय असं टीझरमध्ये दिसतंय.

  • Share this:

मुंबई, 20 आॅगस्ट : लग्न म्हटलं की सगळं कसं मंगलमय असतं. पण या मंगलमय प्रसंगीही सावधान म्हणावं लागतंच. आणि शुभ लग्न सावधान या सिनेमात तर हे पदोपदी म्हणतोय नवरदेव. तो लग्नाला घाबरतोय, बायकोला घाबरतोय. याचं कारण नक्की काय? त्यासाठी तुम्हाला 12 आॅक्टोबरची वाट पाहावी लागेल. या सिनेमाचा टिझर नुकताच रिलीज झालाय.

सुबोध भावे, श्रुती मराठे, गिरीश ओक, निर्मिती सावंत असे तगडे कलाकार या सिनेमात आहेत. आणि मुख्य कलाकार सुबोध भावे लग्नाला घाबरतोय असं टीझरमध्ये दिसतंय.  एकंदरीत हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित जरी असला, तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झालेली मजेशीर अवस्था या टीझरमधून प्रेक्षकांना दिसून येत आहे. या सिनेमाचे कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून हा अस्सल कौटुंबिक चित्रपट आकारास आला असून त्याचे चित्रीकरण दुबई आणि इगतपुरी येथील नयनरम्य ठिकाणी झाले आहे. येत्या १२ ऑक्टोबर या शुभ मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या 'शुभ लग्न सावधान' या चित्रपटासाठी अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे आणि तुषार कर्णिक यांनी निर्मिती सहाय्य केले आहे. ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांच्याबरोबरच प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये या फ्रेश जोडीची अदाकारी असलेल्या, 'शुभ लग्न सावधान' सिनेमातल्या नायकाला लग्नाची इतकी का भीती वाटतेय? हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली नसेल तर नवलच!

सध्या सुबोधची तुला पाहते रे ही मालिकाही सुरू आहे. आणि ती लोकप्रिय होतेय. सविता दामोदर परांजपे सिनेमातही सुबोध दिसणार आहे. त्यामुळे सध्या सुबोध भावे सगळीकडे छा गया.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 04:59 PM IST

ताज्या बातम्या