Home /News /entertainment /

HBD: अतरंगी आहे श्रुती सेठची Love Story; एक-दोन नव्हे अभिनेत्रीनं केलंय तब्बल चार वेळा लग्न

HBD: अतरंगी आहे श्रुती सेठची Love Story; एक-दोन नव्हे अभिनेत्रीनं केलंय तब्बल चार वेळा लग्न

मनोरंजन सृष्टीतील एक ओळखीचा चेहरा म्हणून अभिनेत्री श्रुती सेठकडं (Shruti Seth) पाहिलं जातं. श्रुतीनं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  मुंबई, 18 डिसेंबर-  मनोरंजन सृष्टीतील एक ओळखीचा चेहरा म्हणून अभिनेत्री श्रुती सेठकडं   (Shruti Seth)  पाहिलं जातं. श्रुतीनं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रुती नेहमीच आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. आज ही अभिनेत्री आपला ४३ वा   (Shruti Seth 43 th Birthday)  वाढिदवस साजरा करता आहे. यानिमित्ताने आपण त्याच्या अतरंगी लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया. अभिनेत्री श्रुती सेठचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. अभिनेत्रीनं आपलं शिक्षण मुंबईमध्येच पूर्ण केलं आहे. सेंट झेवियर कॉलेजमधून तिनं आपल्या पदवीचं  शिक्षण घेतलं आहे. श्रुती सेठनं अभिनेत्री होण्यापूर्वी ताज हॉटेलमध्ये गेस्ट रिलेशन एग्झिक्युटीव्ह म्हणून काम केलं आहे. त्यांनतर तिनं आपला मोर्चा मॉडेलिंग क्षेत्राकडं वळवला होता. मॉडेलिंगमध्ये एन्ट्री केल्यांनतर अभिनेत्रीला जाहिरातींची दारे खुली झाली होती. श्रुतीनं फ्रुटी,पॉंड्स, टाटा फायनान्स,लाईफबॉय अशा अनेक मोठमोठ्या उत्पादनांसाठी जाहिराती केल्या आहेत. या जाहिरातींमधून ती एक ओळखीचा चेहरा बनली होती.
  View this post on Instagram

  A post shared by Shruti Seth (@shru2kill)

  'श्श्श कोई है' या हॉरर मालिकेतून श्रुतीनं मालिका विश्वात पाऊल ठेवलं होतं. मात्र तिला खरी ओळख 'शरारत' या लोकप्रिय मालिकेमुळे मिळाली होती. यामध्ये ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री फरीदा जलाल मुख्य भूमिकेत होत्या. त्यांनतर श्रुती सेठ देश मी निकला होगा चाँद, मान, क्या होता है प्यार, बालवीर, रिश्ता अशा अनेक मालिकांमध्ये तिनं काम करत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच अभिनेत्रीने फनासारख्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. अतरंगी आहे अभिनेत्रीची लव्हस्टोरी- श्रुती सेठनं चित्रपट दिग्दर्शक दानिश असलमसोबत लग्न केलं आहे. या दोघांची भेट 'फना' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. फनामध्ये काजोल आणि आमिर खान मुख्य भूमिकेत होते. तर यावेळी श्रुती चित्रपटात काजोलच्या मैत्रिणीच्या भूमिकेत होती. त्याचवेळी दानिश कुणाल कोहलीला अस्टिस्ट करत होता. ही गोष्ट २०१० ची आहे.एके दिवशी सेटवर दानिश मोठमोठ्याने ओरडून सीन समजावून सांगत होता. श्रुती तिच्या बाजूलाच उभी होती. तिनं आपल्या जवळ असलेला माईक त्याला दिला आणि त्याला म्हटलं आपल्या जवळ माईक आहे घ्या तुम्ही. या घटनेनंतर श्रुती आणि दानिशमध्ये संवाद सुरु झाला होता. श्रुती केवळ ९ दिवसच सेटवर होती, मात्र या ९ दिवसांत तिचं आणि  दानिशचं प्रचंड बोलणं झालं होतं. त्यांनतर त्यांच्यात मैत्री झाली. आणि ५ वर्षे एकमेकांना देत केल्यांनतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. एक नव्हे तब्बल चार वेळा केलं लग्न- दानिश हा मुस्लिम होता. तर श्रुती हिंदू होती. त्यामुळे सुरुवातीला कुटुंबाला लग्नासाठी तयार करणं कठीण होतं. मात्र नंतर ते लोक तयार झाले आणि या दोघांनी लग्न केलं. पहिल्यांदा या दोघांनी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. नंतर हिंदू पद्धतीनं आणि त्यांनतर मुस्लिम पद्धतीनं लग्न केलं. आणि सर्वात शेवटी या दोघांनी कोर्ट मॅरेजसुद्धा केलं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment

  पुढील बातम्या