मुंबई 14 ऑगस्ट: श्रुती हसन (Shruti Haasan) ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चेत असते. ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंद्वारे ती कायम नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. मात्र यावेळी ती कुठल्याही फोटोमुळे नव्हे तर एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. (Shruti Haasan troll) या व्हिडीओमध्ये ती चक्क एक इंग्रजी गाणं गाताना दिसत आहे. परंतु दुदैवाची बाब म्हणजे या गाण्यामुळे तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे.
View this post on Instagram
अनिल कपूरच्या घरी लगीनघाई! रियाच्या लग्नासाठी पाहुण्यांची मांदियाळी
श्रुतीच्या कुटुंबात अनेक गायक आहेत. तिचे वडील कमल हासन हे देखील एक उत्तम गायक आहेत. त्यांनी काही चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून देखील भूमिका बजावली आहे. त्यामुळे अशा संगीतमय वातावरणात वाढल्यामुळे श्रुतीला देखील गाण्याची आवड आहे. अन् ही आवड व्यक्त करण्यासाठी तिने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती पियानो वाजवत एक इंग्रजी गाणं गाताना दिसत आहे.
Boycott ट्रेंड झाल्यानंतर राधिका आपटे पुन्हा झाली बोल्ड; म्हणाली, 'not Impressed but...'
मात्र या व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर सध्या जोरदार ट्रोल केलं जात आहे. “ताई तुमचा पियानो चांगला आहे पण आवाज चांगला नाही. तुम्ही अभिनेत्री म्हणूनच उत्तम आहात. तुझा आवाज ऐकून मला उलटी सारखं वाटतंय.” अशा आशयाच्या कमेंट्स करत श्रुतीला जोरदार ट्रोल केलं जात आहे. मात्र काही दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी तिचं कौतुक देखील केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.