मुंबई, 14ऑक्टोबर- दक्षिणेपासून(South) बॉलिवूडपर्यंत (Bollywood) आपली ओळख बनवणारी अभिनेत्री श्रिया सरन(Shriya Saran Baby Name) आई बनली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान तिने एका मुलीला (श्रिया सरन बेबी गर्ल) जन्म दिला आहे. मात्र तब्बल 10 महिन्यांनंतर म्हणजेच 11 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हा खुलासा केला आहे. अशा परिस्थितीत, अलीकडेच अभिनेत्री आणि तिचे पती आंद्रेई कोशेव यांनी नुकताच आपल्या बाळाच्या नावाचा खुलासा केला आहे.
View this post on Instagram
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत श्रियाने आपल्या बाळाच्या नावाचा खुलासा केला आहे. यावेळी आपल्या प्रेग्नेन्सीबाबत बोलताना ती म्हणाली, 'मी लॉकडाऊनपूर्वी दोन आठवड्यांसाठी पती आंद्रेई कोश्चेव्हसोबत (रशियन) बार्सिलोनाला गेली होते. परंतु अचानक लॉकडाऊन झाल्यानंतर मला तिथेच राहावे लागले. यानंतर मी जवळपास दोन वर्षांनी तिथून परत आली आहे. तेही एका गोंडस बाळासोबत. तो काळ आमच्यासाठी खूप चांगला होता.'अभिनेत्रीचा असा विश्वास आहे की' तिच्या या लहान देवदूताने तिचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. '
(हे वाचा:VIDEO: श्रिया सरन बनली आई;अभिनेत्रीने एका वर्षापूर्वीच दिलाय बाळाला ... )
त्याच वेळी, पती आंद्रेई कोश्चेव्हने आपल्या पालक होण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना म्हटलं, की 'पालक असणे हा त्याच्यासाठी एक उत्तम अनुभव आहे. हा संपूर्ण प्रवास त्याच्यासाठी आणि पत्नी श्रियासाठी अद्भुत होता. तसेच त्याने आणि अभिनेत्रीने काही महिन्यांसाठी मुलाचे स्वतःहून संगोपन केले तो रोज काहीतरी नवीन शिकत होता. या संपूर्ण अनुभवाने तो कायमचा बदलला'. तसेच
आंद्रेईने मुलीच्या नावाबद्दल खुलासा केला आणि त्याचा अर्थ तसेच कारण स्पष्ट केले. त्याने म्हटलं, 'बाळाच्या जन्माच्या एक दिवस आधी श्रिया तिच्या आईशी फोनवर बोलत होती आणि तिला समजले की मुलगी जन्माला येणार आहे, तेव्हा अभिनेत्रीच्या आईने तिला' राधा राणी 'म्हणण्यास सुरुवात केली. यावर त्याची प्रतिक्रिया होती, का?
(हे वाचा:Samantha सोबत अफेयर्सच्या चर्चांवर प्रीतमची पहिली प्रतिक्रिया! केला मोठा खुलासा)
जेव्हा त्याने विचारले तेव्हा त्याला कळले की याचा अर्थ रशियन भाषेत 'आनंद' आहे. रशिया आणि हिंदी त्यांच्या संस्कृतीसाठी ओळखले जातात आणि राधा म्हणजे दोन्ही संस्कृतींमध्ये आनंद आहे आणि तेव्हाच या जोडप्याला वाटले की त्यांच्या मुलीचे नाव राधा असेल. त्याने या व्यतिरिक्त इतर कोणतेही नाव शोधण्याचा प्रयत्न केला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, South actress