Big Boss 12 : वीकेण्डच्या आधीच श्रीशांतला बसला झटका

Big Boss 12 : वीकेण्डच्या आधीच श्रीशांतला बसला झटका

बिग बाॅस 12मध्ये यावेळी मोठा झटका बसलाय. वीकेण्ड वाॅरच्या आधीच तीन सदस्य नाॅमिनेट झाले. नेहा, करनवीर बोहरा आणि श्रीशांत हे तिघंही नाॅमिनेट झालेत.

  • Share this:

मुंबई, 11 आॅक्टोबर : बिग बाॅस 12मध्ये यावेळी मोठा झटका बसलाय. वीकेण्ड वाॅरच्या आधीच तीन सदस्य नाॅमिनेट झाले. नेहा, करनवीर बोहरा आणि श्रीशांत हे तिघंही नाॅमिनेट झालेत. आणि नेहाच्या विरोधात जास्त मतं पडली. म्हणजे घराबाहेर होण्याची पाळी तिची होती. पण बिग बाॅसनं सगळ्यांना धक्काच दिला.

बिग बाॅसनं नाॅमिनेशन आधी होणार हे सांगितलं होतंच. पण आता लोकांच्या इच्छेप्रमाणे स्पर्धकाला घराबाहेर जावं लागेल असं बिग बाॅनं सांगितलं. त्याप्रमाणे श्रीशांतला घर सोडावं लागलं.

पण श्रीशांतला बिग बाॅसनं अनुप जलोटांच्या सिक्रेट रूममध्ये नेलं. तिथे आता दोघांवर लक्ष ठेवलं जाईल. याशिवाय व्होटिंग लाईन्स सुरू आहेत. त्यामुळे वीकेण्डला नेहा किंवा करनवीर बाहेर पडेल.

बिग बाॅसमध्ये प्रत्येकाला वेगवेगळं मानधन दिलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार, अनुप जलोटा यांना बिग बॉसच्या १२व्या पर्वात ४५ लाख रुपये देण्यात आले आहेत. वादग्रस्त रिअलिटी शो म्हणून या शोकडे पाहण्यात येतं. त्यात एका विनम्र भजन सम्राटाच्या जाण्याने त्यांच्या इमेजवर काय फरक पडेल हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

अनुप जलोटानंतर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानावर अभिनेता करणवीर बोहराचं नाव आहे. करणवीरला दर आठवड्याला २० लाख रुपये दिले जातात. बिग बॉसच्या निर्मात्यांना अनेक वर्षांपासून करणवीरला बिग बॉसमध्ये सहभागी करुन घ्यायचं होतं. अखेर त्याने १२ व्या पर्वासाठी निर्मात्यांना होकार दिला.

तिसऱ्या स्थानावर ससुराल सिमर का फेम अभिनेत्री दीपिका कक्कडचे नाव येते. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाला बिग बॉस १२ मध्ये हिना खानपेक्षाही अधिक रक्कम दिली गेली आहे. दीपिकाला प्रत्येक आठवड्याला १५ लाख रुपये दिले जाणार आहेत.

First published: October 11, 2018, 12:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading