मुंबई, 19 सप्टेंबर : बिग बाॅस12ची सुरुवातच एकदम वादग्रस्त झाली. वेगवेगळ्या मूड्सच्या व्यक्ती या घरात एकत्र राहतायत. तेव्हा वाद, भांडणं ही होणारच. त्यात श्रीशांतसारखी चिडखोर व्यक्ती असेल तर पहायलाच नको.
श्रीशांत आणि सोमी खानमध्ये जोरदार भांडण झालंय. त्याचं पर्यवसन श्रीसंत घर सोडून जायला निघालाय. बिग बाॅस दार उघडा अशी बोंबाबोंब त्यानं सुरू केली.या भांडणात दीपक ठाकूरनं सोमीवर निशाणा साधलाय. कृती वर्मा श्रीसंतची बाजू घेतेय. तर दीपिका दोघांना समजावतेय.
सोमी म्हणालीय, ' श्रीशांत मोठे आहेत म्हणून मी दुर्लक्ष करतेय. नाही तर मीच वाईट ठरेन.' एकूण काय बिग बाॅसच्या घरात हाय होल्टेज ड्रामा सुरू झालाय.
View this post on Instagram
बिग बाॅसमध्ये प्रत्येकाला वेगवेगळं मानधन दिलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार, अनुप जलोटा यांना बिग बॉसच्या १२व्या पर्वात ४५ लाख रुपये देण्यात आले आहेत. वादग्रस्त रिअलिटी शो म्हणून या शोकडे पाहण्यात येतं. त्यात एका विनम्र भजन सम्राटाच्या जाण्याने त्यांच्या इमेजवर काय फरक पडेल हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
अनुप जलोटानंतर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानावर अभिनेता करणवीर बोहराचं नाव आहे. करणवीरला दर आठवड्याला २० लाख रुपये दिले जातात. बिग बॉसच्या निर्मात्यांना अनेक वर्षांपासून करणवीरला बिग बॉसमध्ये सहभागी करुन घ्यायचं होतं. अखेर त्याने १२ व्या पर्वासाठी निर्मात्यांना होकार दिला.
तिसऱ्या स्थानावर ससुराल सिमर का फेम अभिनेत्री दीपिका कक्कडचे नाव येते. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाला बिग बॉस १२ मध्ये हिना खानपेक्षाही अधिक रक्कम दिली गेली आहे. दीपिकाला प्रत्येक आठवड्याला १५ लाख रुपये दिले जाणार आहेत.