S M L

अभिनयाच्या वेडापायी 'त्यानं' खाकी वर्दीला ठोकला रामराम

आपली आवड जोपासण्यासाठी अनेक जण सर्व काही पणाला लावतात. सांगलीच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने अभिनय आणि मॉडेलिंगच्या वेडापायी चक्क खाकीला रामराम ठोकलाय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 19, 2018 03:52 PM IST

अभिनयाच्या वेडापायी 'त्यानं' खाकी वर्दीला ठोकला रामराम

19 मार्च : आपली आवड जोपासण्यासाठी अनेक जण सर्व काही पणाला लावतात. सांगलीच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने अभिनय आणि मॉडेलिंगच्या वेडापायी चक्क खाकीला रामराम ठोकलाय.

सांगलीचा पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील याने लहानपणापासून जोपासलेले अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस दलाच्या नोकरीला सोडचिठ्ठी दिली. श्रीकांत पाटीलनं 'गावठी' सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय. सिनेमा 30 मार्चला रिलीज होईल.

श्रीकांतचा हा जीवनप्रवास सोपा नव्हता. श्रीकांत पाच वर्षांचा असताना मुंबई क्राईम ब्रान्चमध्ये कार्यरत असणाऱ्या वडिलांचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले. एक पाच आणि दुसरा तीन वर्षांचा, अशा दोन लहान मुलांची जबाबदारी श्रीकांतच्या आईने मोठ्या धीराने पेलली. शालेय जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेणारा श्रीकांत अभिनयातही चमकू लागला. आपल्याला यातच करियर करायचे, हे त्याने मनाशी पक्के केले होते. पण, आईच्या खांद्यावरचा भार थोडा हलका करण्यासाठी श्रीकांतने कलेचे वेड बाजूला सारून २०१० साली, वयाच्या एकोणीसाव्या वर्षी पोलीस दलात शिपाईपदावर रुजू झाला. सहा फूट उंच, गोरा वर्ण, आखीव-रेखीव चेहरा, पिळदार शरीर आणि घारे डोळे असलेला खाकी वेशातला पोलीस पाहून सर्वजण कुतुहलाने श्रीकांतकडे बघत.

प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या श्रीकांतला चित्रपटविश्व खुणावत होते. त्याने आईला मनातील इच्छा बोलून दाखवली.  हाती असलेली पोलीसाची सरकारी नोकरी सोडून श्रीकांत मायानगरी मुंबईत दाखल झाला.

किशोर नावीद कपूर यांच्याकडे त्याने अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. गावठी चित्रपटाच्या पहिल्याच ऑडीशनमध्ये श्रीकांतची निवड झाली आणि श्रीकांतचे चित्रपटात अभिनय करण्याचे स्वप्न तर साकार झालेच. आता प्रेक्षकांचं प्रेम किती मिळतंय हे 30 मार्चपासूनच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2018 03:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close