श्रीदेवीच्या बाहुलीनं सजलंय सिंगापूरचं रेस्टाॅरंट

श्रीदेवीच्या बाहुलीनं सजलंय सिंगापूरचं रेस्टाॅरंट

खरं तर जगभरात अनेक रेस्टॉरंटस् आहेत पण सिंगापूरमधलं हे रेस्टॉरंट जरा खास आहे. कारण या रेस्टॉरंटमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवीची बाहुली लावली आहे. ही बाहुली अगदी हुबेहूब श्रीदेवीसारखी दिसते.

  • Share this:

27 नोव्हेंबर : खरं तर जगभरात अनेक रेस्टॉरंटस् आहेत पण सिंगापूरमधलं हे रेस्टॉरंट जरा खास आहे. कारण या रेस्टॉरंटमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवीची बाहुली लावली आहे. ही बाहुली अगदी हुबेहूब श्रीदेवीसारखी दिसते. यावर श्रीदेवी आणि त्यांचे पती बोनी कपूर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

बोनी कपूर म्हणाले की, 'भारतात आणि परदेशात अशी अनेक दुकानं आणि रेस्टॉरंट आहेत ज्यांना श्रीदेवीचं नाव आहे यातूनच त्यांचा स्टारडम दिसून येतो.'

या इतक्या सुंदर पुतळ्याबद्दल श्रीदेवींनीही  आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या की, 'मी काय बोलू?  मी खूप खुश आहे. इथे इतक्या वर्षांनंतरही माझी आठवण आहे, ते माझी स्तुती करतात आपल्या दुकानांना माझं नाव देतात या सगळ्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. 50 वर्षांनंतरही मला आठवणीत ठेवल्याबद्दल धन्यवाद.'

श्रीदेवीनं सिनेसृष्टीतला 50 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. त्यांच्या अभिनयाने त्यांनी सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.

First published: November 27, 2017, 7:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading