श्रीदेवीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू, शरीरात सापडला दारूचा अंश

श्रीदेवीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू, शरीरात सापडला दारूचा अंश

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजल्यापासून त्यांच्या घराजवळ चाहत्यांचीही गर्दी झाली आहे. पण अद्याप त्याचं पार्थिव दुबईतच आहे.

  • Share this:

दुबई, 26 फेब्रुवारी : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूविषयी झालेल्या नव्या खुलाश्यात धक्कादायक माहिती पुढे आलीय. श्रीदेवीचा मृत्यू हा बाथटबमध्ये पडल्याने बुडून झाला असल्याची माहिती युएईच्या आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात देण्यात आलीय. याआधी श्रीदेवी यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या धक्क्यानं झाला अशी माहिती होती.

मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात श्रीदेवीच्या शरीरात दारूचा अंश असल्याची माहिती देण्यात आलीय. लग्नसमारंभात श्रीदेवींनी अतीमद्यपान केलं होतं. त्यानंतर त्या बाथरूमध्ये गेल्या तोल जाऊन पडल्या. पडल्यामुळं त्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती आता पुढं आलीय असा दावा खलीज टाईम्सनं केलाय. श्रीदेवीचं पार्थिव कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं असून खास विमानाने ते मुंबईत आणण्यात येणार आहे.

या धक्क्यातून कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी बॉलिवूडमधले सहकलाकार, श्रीदेवी यांचे दीर अनिल कपूर यांची भेट घेण्यासाठी पोहचताहेत.

कालपासून रेखा, अनुपम खेर, यांच्यासह अनेकांनी इथे उपस्थिती लावली. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजल्यापासून त्यांच्या घराजवळ चाहत्यांचीही गर्दी झाली आहे. पण अद्याप त्याचं पार्थिव दुबईतच आहे.

एक नजर टाकूयात काय आहे दुबईतली कायदेशीर प्रक्रिया

- पोस्ट मॉर्टमनंतर पार्थिवावर रासायनिक प्रक्रिया

- पोलिसांकडून मृत्यूचा दाखला दिला जातो

- दुबईतल्या भारतीय दूतावासाकडून पासपोर्ट रद्द केला जातो

- दुबई इमिग्रेशन विभागाकडून पुढची प्रक्रिया

- पार्थिव कुटुंबाकडे सुपूर्द करण्याची सरकारी वकिलांकडून परवानगी

First published: February 26, 2018, 12:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading