श्रीदेवीची मुलगी जान्हवीनं आपल्या वाढदिवशी काय केलं?

श्रीदेवीची मुलगी जान्हवीनं आपल्या वाढदिवशी काय केलं?

त्या दिवशी आईच्या आठवणींनी जान्हवी व्याकूळ तर नक्कीच झाली. पण ती नुसती रडत बसली नाही.

  • Share this:

07 मार्च : मुलीचा 21वा वाढदिवस आणि तिची आईच अगदी काही दिवसांपूर्वी जग सोडून गेलेली. हा मनाला यातना देणारा अनुभव अनुभवला श्रीदेवीच्या मुलीनं जान्हवीनं. जान्हवीचा मंगळवारी 6 मार्चला वाढदिवस. ती 21 वर्षांची झाली. त्या दिवशी आईच्या आठवणींनी जान्हवी व्याकूळ तर नक्कीच झाली. पण ती नुसती रडत बसली नाही.

तिनं वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमाला भेट दिली. अगदी साधेपणानं. आपल्या घरादारापासून दूर असलेल्या आजी-आजोबांशी मायेनं गप्पा मारल्या. त्यांची विचारपूस केली. जान्हवीचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतायत.

दुबईत जान्हवीनं आईला खरेदीची लिस्टही दिली होती. पण दुर्दैवानं खरेदी तर दूरच पण तिची आईही दुबईहून परत नाही आली. आपलं दु:ख कमी करण्यासाठी जान्हवीनं अशा पद्धतीनं हा वाढदिवस साजरा केला.

First published: March 7, 2018, 10:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading