श्रीदेवींच्या सावत्र मुलीनं उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

श्रीदेवींच्या सावत्र मुलीनं उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

श्रीदेवींचं आपल्या दोन्ही मुलींशी खूप खास बाँडिंग होतं मात्र त्यांच्या सावत्र मुलांशी त्यांचं नातं तितकसं चांगलं नव्हतं. मात्र श्रीदेवींच्या मृत्यूनंतर ही सर्व भावंड एकत्र आली.

  • Share this:

मुंबई, 07 जून : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा 2017मध्ये आलेला मॉम हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमासाठी श्रीदेवी यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. आई आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावला. श्रीदेवी त्यांच्या खऱ्या आयुष्यातही त्यांच्या दोन्ही मुलींचं स्थान खूप खास होतं. त्यांचं हे खास बाँडिंग नेहमीच सर्वांनी पाहिलं. पण श्रीदेवींच्या सावत्र मुलांशी त्यांचं नातं फारसं चांगलं नव्हतं तरीही श्रीदेवी गेल्यानंतर अर्जुन आणि अंशुलानं खूशी आणि जान्हवीला नेहमीच आधार दिला. पण आता श्रीदेवींच्या सावत्र मुलीनं साखरपुडा उरकला असून तिनं हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ही श्रीदेवींची खरी सावत्र मुलगी नाही. 'मॉम' सिनेममध्ये श्रीदेवींच्या सावत्र मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सजल अली आहे.

अडीच वर्षांच्या मुलीच्या बलात्कारावर चिडलं बॉलिवूड, आरोपीला फाशीच्या शिक्षेची केली मागणी

सजल अलीनं श्रीदेवींच्या मॉम सिनेमामध्ये सावत्र मुलीची भूमिका साकारली होती. सजल पाकिस्तानी अभिनेत्री असून तिनं 2016मध्ये 'जिंदगी कितनी हसीन हैं' या सिनेमाद्वारे बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिला मॉम हा सिनेमा मिळाला आणि आता अवघ्या दोन सिनेमांनंतर सजलनं बॉयफ्रेंड अहद रजा मीरसोबत साखरपुडा केला. आपल्या साखरपुड्याची माहिती देत सजलनं सोशल मीडियावर फोटो शेअर केले. सजलनं लिहिलं, 'आज माझ्या आयुष्याची नवी सुरुवात झाली. हे सांगताना आनंद होत आहे की, आमच्या कुटुंबीयांच्या आशीर्वादानं आम्ही साखरपुडा केला आहे.'

रणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग? यासोबत मनोरंजन विश्वातील घडामोडी

अहद रजा मीर हा सुद्धा टीव्ही अभिनेता असून तो सजलसो अनेक पाकिस्तानी टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. यात त्यांच्या लोकप्रिय मालिका 'आंगन' आणि 'यकिन' यांचा समावेश आहे. या मालिकांमध्ये या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. याशिवाय 'मॉम' सिनेमातील सजलच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं. या सिनेमात श्रीदेवींनी एका अशा आईची भूमिका साकारली होती जी आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढते. यानंतर श्रीदेवी 'झीरो' सिनेमामध्ये पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसल्या आणि हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

World Cup दरम्यान रिअल हिरोंसोबत व्हायरल झालेले रणवीर सिंगचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

 

View this post on Instagram

 

MOM #Mom

A post shared by Sajal Ali (@sajalaly) on

'मॉम' सिनेमात श्रीदेवी आणि सजल अली यांच्या व्यतिरिक्त अदनान सिद्दीकी, अक्षय खन्ना आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. रवी उद्यावर यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाला फक्त भारतातच नाही चीनमध्येही चांगला प्रतिसाद लाभला होता.

VIDEO- शाहरुख खानने चक्क गाडीच्या छतावर चढूनच चाहत्यांना दिलं सरप्राइज

First published: June 7, 2019, 3:51 PM IST

ताज्या बातम्या