श्रीदेवीची बाॅलिवूडमध्ये 50 वर्ष पूर्ण

श्रीदेवीची बाॅलिवूडमध्ये 50 वर्ष पूर्ण

श्रीदेवीनं बाॅलिवूडमध्ये 50 वर्ष पूर्ण केलेत.

  • Share this:

05 एप्रिल : श्रीदेवीनं बाॅलिवूडमध्ये 50 वर्ष पूर्ण केलेत.आणि त्याचं सेलिब्रेशन करणार आहे तिचा नवरा बोनी कपूर.

बोनी कपूर लवकरच जंगी पार्टी देणार आहेत. त्यासाठी श्रीदेवीच्या सर्व सहकलाकारांना बोलवणार आहेत. या पार्टीत हिंदी कलाकारांबरोबर तामिळ आणि तेलगू कलाकारही असतील.

श्रीदेवी चार वर्षांची असतानाच तिनं सिनेमामध्ये काम सुरू केलं. तामिळ सिनेमात तिनं बालकलाकार म्हणून भूमिका केली. 13व्या वर्षी 'ज्युली'मधून तिनं हिंदी सिनेमात पाय ठेवला. 1978मध्ये 'सोलहवा साल'मधून तिनं हिराॅइन म्हणून करियर सुरू केलं. आतापर्यंत श्रीदेवीचे 500 सिनेमे झालेत.

लवकरच 'माॅम'मधून तिची वेगळी भूमिका पाहायला मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 03:21 PM IST

ताज्या बातम्या