Home /News /entertainment /

VIDEO:‘पुष्पा नाम सुनके .....श्रेयस तळपदेने एअरपोर्टवरच लावली आग, फॅन्स म्हणाले...

VIDEO:‘पुष्पा नाम सुनके .....श्रेयस तळपदेने एअरपोर्टवरच लावली आग, फॅन्स म्हणाले...

Shreyas Talpade

Shreyas Talpade

दाक्षिणात्य सिनेसुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा द राइज'(Pushpa: The rise) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुनची अनोखी स्टाइल, त्याचा डान्स, डायलॉग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहेत.

पुढे वाचा ...
  मुंबई, 23 जानेवारी: दाक्षिणात्य सिनेसुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा द राइज'(Pushpa: The rise) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुनची अनोखी स्टाइल, त्याचा डान्स, डायलॉग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहेत. फक्त दाक्षिणात्य भाषांमध्येच नाही तर हिंदी प्रेक्षकांमध्येही या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. हा सिनेमा दाक्षिणात्य भाषेसोबतच हिंदीमध्ये देखील खूपच लोकप्रिय झाला आहे. हिंदी व्हर्जनमध्ये(Pushpa Hindi version) अल्लू अर्जुनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने(Shreyas Talpade) आवाज दिला आहे. आता श्रेयसनेच थेट चाहत्यावर्गात डायलॉगबाजी करत एअरपोर्टवरच आग लावली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रेयस तळपदेचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मुंबई एअरपोर्टवरील आहे. व्हिडीओमध्ये श्रेयस तळपदे पुष्पाचा लोकप्रिय ठरलेला डायलॉग ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर है मै’ बोलताना दिसत आहे. तो डायलॉग ऐकून फोटोग्राफर देखील श्रेयसची वाह वाह करत असल्याचे ऐकू येत आहे.
  हिंदी भाषेत हा सिनेमा हिट होण्यात अभिनेता श्रेयस तळपदेचाही मोठा वाटा आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की पुष्पा द राइज सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला अर्जुनला आवाज श्रेयस तळपदे ने दिला आहे. याबाबतची माहिती स्वतः श्रेयसने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना दिली होती. अल्लू अर्जुनं श्रेयस तळपदेवर फिदा 'श्रेयसजी पुष्पा सिनेमासाठी तुमचा सुंदर आवाज दिल्याबद्दल खूप आभार. आपण लवकरच भेटू अशी अपेक्षा करतो. ऑन कॅमेरा मी तुमचे आभार मानू इच्छितो. 'पुष्पा' पात्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम केल्याबद्दल तुमचे खूप आभार.' अशा शब्दात अल्लू अर्जुनं श्रेयस तळपदेचे कौतुक केले आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Allu arjun, Bollywood, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या