अभिनेता श्रेयस तळपदेनं दिला The Lion King साठी आवाज, हे आहे ‘गोड’ कारण

श्रेयसनं या सिनेमात टिमॉन (Timon)च्या भूमिकेसाठी आवाज देण्यासोबतच या सिनमातील ‘Hakuna matata’ हे गाणंही गायलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 04:49 PM IST

अभिनेता श्रेयस तळपदेनं दिला The Lion King साठी आवाज, हे आहे ‘गोड’ कारण

मुंबई, 19 जुलै : सध्या बॉलिवूडमध्ये The Lion King चीच चर्चा सर्वाधिक आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं या सिनेमात सिंबाच्या तर स्वतः शाहरुखनं मुसाफाच्या भूमिकेसाठी आवाज दिला आहे. या सिनेमातून आर्यन खान त्याचा बॉलिवूड डेब्यू सुद्धा करत आहे. याशिवाय मराठी अभिनेता श्रेयस तळपदेनं सुद्धा या सिनेमात टिमॉन (Timon) च्या भूमिकेसाठी आवाज दिला आहे. श्रेयसनं नुकतंच एका मुलाखतीत या सिनेमातील टिमॉनच्या भूमिकेसाठी आवाज देण्यामागचं कारणं सांगितलं आहे.

श्रेयसनं ‘आयएएनएस’ ला दिलेल्या मुलाखतीत The Lion King ला आवाज देण्यामागचं कारण स्पष्ट केलं. श्रेयस म्हणाला, ‘मी हा सिनेमा फक्त माझी मुलगी आज्ञासाठी साइन केला. ती आता खूप लहान आहे. तिला सध्या काहीही समजत नाही. पण काही वर्षांनी ती मोठी हेईल तेव्हा ती हा सिनेमा बघेल आणि त्यावेळी ती आपल्या बाबाचा आवाज ओळखू शकेल. माझ्या कामाचा माझ्या मुलीला अभिमान वाटावा असं काहीतरी मला तिच्यासाठी करायचं आहे. त्यासाठी मी हा सिनेमा साइन केला.’

‘माझ्याशी नीट बोल, मी तुझी नोकर नाही’; हिना- रुपालीचा वाद चिघळला

Loading...

 

View this post on Instagram

 

Happy and safe Diwali from my Family to yours 💥❤ #LaxmiPujan #Office #Home #Diwali

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27) on

श्रेयसनं या सिनेमात टिमॉनच्या भूमिकेसाठी आवाज देण्यासोबतच या सिनमातील ‘Hakuna matata’ हे गाणंही गायलं आहे. हे इंग्लिश गाणं हिंदीमध्ये रिक्रिएट करण्यात आलं आहे. या गाण्याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, जेव्हा मी टिमॉनच्या डबिंगसाठी जात असे त्यावेळी मी हे गाणं गुणगुणत असे. त्यावेळी डबिंग डायरेक्टर आजूबाजूला होते. त्यांनी मला गुणगुणताना ऐकलं आणि हे गाणं सिनेमासाठी म्हणशील का असं विचारलं. मी खरं तर त्यावेळी तयार नव्हतो. कारण गाणं हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. पण मी विचार केला की हे मला जमेल आणि मी या गाण्यासाठी तयार झालो.

नवाब शहाने कुटुंबासमोरच पूजा बत्राला असं केलं प्रपोज, म्हणाला...

लहान मुलांसोबत अशी वागली मलायका, VIDEO पाहून भडकले नेटकरी

==================================================================

VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्त्याला भगदाड; पुलालगतचा रस्ता गेला वाहून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...